वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेडची आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या तिमाहीत महत्त्वाच्या निकषांवर दमदार कामगिरी – दुहेरी विकासाला गती

 वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेडची आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या तिमाहीत महत्त्वाच्या निकषांवर दमदार कामगिरी – दुहेरी विकासाला गती


 वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेड (एनएसई - ONEPOINT | बीएसई: 544748) या जागतिक स्तरावरील, एआय- पॉवर्ड कस्टमर एक्सपिरीयन्स आणि एंटरप्राइज ऑपरेशन्स कंपनीने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या तिमाहीत ऑपरेशन्स विभागाने १५८.३२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवल्याचे जाहीर केले असून आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील ६९.०१ कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत त्यात वार्षिक पातळीवर १२९.४ टक्क्यांची, तर तिमाही पातळीवर ६४.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीतील नफा १६.३१ कोटी रुपयांवर गेला असून त्यात गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील ९.४४ कोटी रुपये नफ्याच्या तुलनेत ७२.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. 


तिमाहीतील ईबीआयटीडीए वार्षिक पातळीवर ९१.५ टक्क्यांनी वाढून २४.९ टक्के मार्जिनसह ३९.३८ कोटी रुपयांवर गेला आहे. आर्थिक वर्ष पूर्ण क्षमतेसह नोंदवला आहे. या जागतिक पातळीवरील मानवी सेवा विभागाला आता कंपनीने लॅटिन अमेरिकेतली ताब्यात घेतलेल्या नेटकॉमचे संपूर्ण तिमाहीत पाठबळ मिळाले आहे. त्याचप्रमाणे रिसोलएक्स या 1Point1 कंपनीच्या रिझोल्यूशन-अज-ए-सर्व्हिस (RaaS) मॉडेलवर आधारित एजंटिक एआय इंजिनचा पाठिंबा कंपनीला मिळाला आहे. ऑटोमेशनचा विकास होत असून कंपनीच्या उत्पन्नातील हायर- मार्जिन एआय, ऑर्केस्ट्रेशन आणि आउटकम- लिंक्ड मॉडेल्सकडे वळत असून मानव कौशल्य विभाग जास्त गुंतागुंतीच्या, जजमेंट-वर आधारित कामाकडे वळत आहे. 

या तिमाहीतील ईबीआयटीडीए मार्जिनमधे नेटकॉमचे डिलिव्हरी मिक्स एकत्रितपणे दिसले असून ८.१२ कोटी रुपयांच्या वित्तीय खर्चात (आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतील १.८५ कोटी रुपयांवरून) प्रामुख्याने संपादनाशी संबंधित कर्ज नोंदवले गेले आहे. आधीच्या कालावधीतील आकडेवारी थेट तुलनात्मक नाही, कारण आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या तिमाहीत नेटकॉमचा पहिल्यांदाच पूर्ण कालावधीसाठी समाविष्ट करण्यात आली आहे. 


व्यावसायिक वैशिष्ट्ये – आर्थिक वर्ष २७ ची पहिली तिमाही

* सर्व्हिस इंजिन – नेटकॉम बीसीसीचे (LATAM) पहिलेच पूर्ण तिमाहीचे कनसॉलिडेशन, अमेरिकेसाठी नियर- शोअर डिलिव्हरी सेवेचा विस्तार 

* एआय इंजिन – रिसोलेएक्सने आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या तिमाहीत ७ एंटरप्राइज ग्राहकांसह १२ लाइव्ह डिप्लॉयमेंट केले असून त्यात विमा, विमानवाहतूक, बँकिंग, ऑटोमोटिव्ह आणि डिजिटल असेट्स क्षेत्रातील ग्राहकांचा समावेश आहे. त्यात मोठ्या जीवन विमा कंपन्या, दोन सेंट्रिल अमेरिकन बँकिंग संस्था व नेटकॉम संपादनामुळे मिळालेली भारतातील आघाडीची विमानकंपनी, प्रिमियम युरोपीय मोटरसायकल ब्रँड्स यांचा समावेश असून ग्राहकांमधे सरासरी प्रत्येकी एक डिप्लॉयमेंट करण्यात आले आहे. भारत, मध्यपूर्व, अमेरिका व लॅटिन अमेरिकेत प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट सक्रिय आहे.  

* 150K+ रिझोल्यूशन्सचे वितरण. कार्यक्षमतेत ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. Resolution-as-aService द्वारे मोठ्या प्रमाणावर मोजता येतील असे परिणाम मिळत आहे. ग्राहक अनुभव क्षेत्रात मोठे बदल होत असतानाच हे निकाल जाहीर झाले असून एंटरप्रायजेस वेगवेगळ्या, स्वतंत्र एआयपासून एआय, मानवी कौशल्य, डोमेनचे सखोल ज्ञान आणि कार्यकारी अमलबजावणी यांचा समावेश असलेल्या इंटीग्रेटेड इंटेलिजन्सकडे वळत आहेत. 1Point1 चे धोरण या बदलाशी सुसंगत असून त्यामुळे उद्योगांना केवळ कामावर देखरेख करण्याऐवजी ठोस, मोजता येण्यासारखे परिणाम मिळण्यास मदत होत आहे. नेमके हेच वैशिष्ट्य कंपनीच्या ‘फ्रॉम कॉन्व्हर्सेशन टु रिझोल्यूशन्स’ या विचारात समाविष्ट करण्यात आले आहे.  


विकास धोरण आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीची उद्दिष्टे – आर्थिक वर्ष २७ ची दमदार सुरुवात करत ऑपरेशन्स विभागाचे उत्पन्न १५८.३२ कोटी रुपयांवर गेले असून कंपनीने या आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीमधे विकासाची गती कायम राखण्याचे ध्येय ठेवले आहे. वन पॉइंट वन सोल्युशन्स लि. कंपनीने आर्थिक वर्ष २७ मधे सध्याचे कामकाजाचे निकष कायम राखत वार्षिक पातळीवर अंदाजे दुप्पट उत्पन्न विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. 


कंपनीच्या कामगिरीविषयी वन पॉइंट वन सोल्युशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अक्षय छाब्रा म्हणाले, ‘आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या तिमाहीत दोन्ही विभागात चांगला विकास दिसून आला असून त्यात नेटकॉम बीसीसीमुळे आणखी विस्तारलेल्या जागतिक मानवी सेवा तसेच रिसोलएक्सच्या एजेंटिक एआयचा समावेश आहे. परिणामी उत्पन्न वार्षिक पातळीवर दुप्पट झाले आहे. एजेंटिक एआयद्वारे ग्राहक अनुभव क्षेत्रातील प्राथमिक टप्पा नव्याने प्रस्थापित केला जात असून आम्ही ८००० मनुष्यबळ, १०० पेक्षा जास्त एंटरप्राइज लोगो आणि दोन स्टॉक एक्सचेंज नोंदणी प्राप्त केल्या आहेत. आम्ही शिस्तबद्ध लक्ष्य ठेवले आहे – रूटिन ऑटोमेट करणे, मानवी आयुष्य सुखकर करणे आणि कामापेक्षा उपाययोजना जास्त जबाबदार बनवणे. यावरून निष्कर्षांवर असलेला आमचा भर दिसून येतो आणि त्याचमुळे आर्थिक वर्ष २७ मधे अधिक मोठा विस्तार, क्षमता व सक्रियतेसह प्रवेश करणे शक्य झाले आहे.’ ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीतील आर्थिक निकाल www.1point1.com या आमच्या संकेतस्थळावरील इन्व्हेस्टर रिलेशन विभागात उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार