टीसीएस आयओएनच्या इंटेलिजेमच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा
टीसीएस आयओएनच्या इंटेलिजेमच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतून विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आवश्यक असणाऱ्या कौशल्यांनी सक्षम केले जाईल आणि कोविड-१९ नंतरच्या वास्तविक जगाला सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार केले जाईल मुंबई , 28 ऑगस्ट , २०२० : माहिती तंत्रज्ञान सेवा , सल्ला आणि व्यावसायिक सुविधा पुरवणारी जागतिक स्तरावरील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) (बीएसई: ५३२५४० , एनसीई: टीसीएस) टीसीएस आयओएन इंटेलिजेम या स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीसाठी रजिस्ट्रेशन्स स्वीकारण्यास सुरुवात झाली असल्याची घोषणा केली आहे. टीसीएस आयओएन इंटेलिजेम ही इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. टीसीएस आयओएन इंटेलिजेम ही आधीपासून डिझाईन करण्यात आलेली , पद्धतशीरपणे घेतली जाणारी परीक्षा आहे. या स्पर्धेतून युवा विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करण्यात मदत मिळते...