मिल्की मिस्ट डेअरी फूडचा आयपीओ ११ ऑगस्ट २०२६ पासून खुला
मिल्की मिस्ट डेअरी फूडचा आयपीओ ११ ऑगस्ट २०२६ पासून खुला मिल्की मिस्ट डेअरी फूड मर्यादित कंपनीच्या समभागांचा प्राथमिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) मंगळवार ११ ऑगस्ट २०२६ रोजी उघडणार आहे. या आयपीओमध्ये प्रत्येक समभागाचे अंकित मूल्य रु. २ असून किंमत श्रेणी रु. १३३ ते रु. १४० निश्चित करण्यात आली आहे. निम्न किंमत अंकित मूल्याच्या ६६.५० पट तर उच्च किंमत ७० पट आहे. बोली प्रस्ताव मंगळवार ११ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल आणि गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी बंद होईल. मुख्य गुंतवणूकदारांसाठी बोली दिनांक सोमवार १० ऑगस्ट २०२६ आहे. किमान १०७ समभागांसाठी बोली लावता येईल आणि त्यानंतर १०७ च्या पटीतच बोली करता येईल. कर्मचारी आरक्षण भागात पात्र कर्मचाऱ्यांना प्रति समभाग रु. १३ सूट देण्यात येत आहे. एकूण प्रस्ताव आकार रु. १,५५३ कोटी पर्यंत आहे. यात नवीन निर्गम रु. १,४२८ कोटी पर्यंत आणि विक्री प्रस्ताव रु. १२५ कोटी पर्यंत समाविष्ट आहे. विक्री प्रस्तावात सतीशकुमार टी यांच्याकडून रु. ७५ कोटी पर्यंत आणि अनिता एस यांच्याकडून रु. ५० कोटी पर्यंत समभाग विक्री होणार आहे. कंपनीने प्रमुख व्यवस्थापकांच्या सल्ल्...