हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा, १,००० वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन
हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा , १ , ००० वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन तामिळनाडू येथील करूर जिल्ह्यातील १२० नारळाच्या झाडांचे हैद्राबाद येथील कान्हा शांती वनम येथे नुकतेच यशस्वीरित्या विस्थापन व पुनर्रोपण केले गेले . हैद्राबाद स्थित हार्टफूलनेस इन्स्टिट्यूट ( www.heartfulness.org ) या संस्थेने आपल्या यशोगाथेत आणखी एक विक्रम रचला असून संस्थेने केवळ एका वर्षभरात १ , ००० हून अधिक वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन केले आहे . या उपक्रमांतर्गत , तामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्यातल्या १५ वर्षांपूर्वीच्या १२० नारळाच्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले . नुकत्याच यशस्वी झालेल्या वृक्षांच्या तुकडीत ६० झाडांचा समावेश करण्यात आला असून हैद्राबाद येथील नवीन परिसरात या झाडांची नव्याने लागवड करण्यात हार्टफूलनेस या संस्थेला यश आले आहे . केवळ झाडांचे विस्थापन व पुनर्रोपणच नव्हे , तर त्यांची मशागत करणारा हा आगळावेगळा उपक्रम हाती घेणारी ही पहिलीच संस्था ठरली आहे . प्रत्येक वृक्षाच्या अस्तित्वाच्या कालावधीत विशिष्ट असे फ...