गोएअरच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ऑक्टोबरपासून आरंभ
गोएअरच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला
ऑक्टोबरपासून आरंभ
·
फुकेत आणि माले या आंतरराष्ट्रीय ठिकाणांची
घोषणा
·
फुकेतला जाणारी सर्वात पहिली भारतीय विमान सेवा
·
ऑक्टोबर 11, 2018 ला दिल्ली ते फुकेत विमान
प्रवासाने शुभारंभ
·
ऑक्टोबर 14, 2018 ला मुंबई ते माले विमान प्रवासाने
शुभारंभ
·
शुभारंभाच्या दोन्हीकडील विमान
प्रवासासाठी आकर्षक विमान भाडे- सुरुवात भारतीय रुपये 18,999 (फुकेत) आणि रुपये 17,999 (माले)
गोएअर ही भारतातील तेजीने प्रगती करणारी
विमानसेवा असून आता ती आंतरराष्ट्रीय सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑक्टोबर 11, 2018 पासून गोएअरतर्फे दिल्ली आणि
मुंबईहून फुकेत, थायलंड येथे भारतातील सर्वात पहिली थेट विमान सेवा सुरू करण्यात
येणार आहे. यानंतर लगेच दुसरी
आंतरराष्ट्रीय सेवा ही मुंबई आणि दिल्लीहून माले, मालदीव येथे ऑक्टोबर 14, 2018
रोजी सुरू करण्यात येईल. नजीकच्या भविष्यात
ही सेवा बंगळूरू येथे देखील सुरू केली जाईल.
गोएअरने
त्यांच्या एका दशकाहून अधिक काळ आंतर्देशीय विमान सेवा यशस्वीरीत्या देऊ केल्यावर
आता आंतरराष्ट्रीय स्तरात पदार्पण केले. गोएअर त्यांच्या A320 या विमानाचा
त्यांच्या सर्व सेवेत आणि या दोन आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी देखील वापर सुरू ठेवणार
आहे. या विमानाचा बरोबरच ही विमान कंपनी त्यांच्या ताफ्यात आणखी 28 विमानांची भर
घालेल आणि दर आठवड्याला 1680 विमाने धाव घेतील.
आपल्या देशांतर्गत कारकिर्दीत आणखी भर घालण्याचा, विमानसेवा उद्योगात विमान
उड्डाणाचा अतिशय चांगला अनुभव देऊ करण्याचा आणि किफायतशीर मूल्य देऊ करण्याचे
गोएअरचे ध्येय आहे.
गोएअर दर आठवड्याला 03 वेळा मुंबई-फुकेत-मुंबई अशा थेट विमानसेवा सुरू करणार
आहे. या प्रवासाचे परतीचे भाडे हे अतिशय
किफायतशीर असणार असून त्याची सुरुवात भारतीय मूल्यात रुपये 18,999 (सर्व समावेशक); दर आठवड्याला दिल्ली- फुकेत-दिल्ली
02 वेळा अशा थेट विमान सेवा किफायतशीर
किंमतीत सुरू करणार असून त्याचे परतीचे भाडे हे भारतीय मूल्यात रुपये 18,999 (सर्व समावेशक) असणार आहे.
याचप्रकारे, या विमानकंपनीतर्फे दर आठवड्याला 03 वेळा मुंबई-माले-मुंबई अशी
थेट विमान सेवा सुरू करण्यात येणार असून त्याचे परतीचे भाडे हे किफायतशीर असणार
असून त्याची सुरवात भारतीय मूल्यात रुपये 17,999 (सर्व समावेशक) असणार आहे. दर
आठवड्याला 02 वेळा दिल्ली-माले-दिल्ली अशी विमान सेवा सुरू करण्यात येणार असून त्याचे
परतीचे भाडे हे किफायतशीर असणार असून त्याची सुरवात भारतीय मूल्यात रुपये 18,999 (सर्व समावेशक) असणार आहे.
आंतरराष्ट्रीय
सेवेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना गोएअरचे सीईओ श्री. कॉर्नेलिस वेरीविज्क म्हणाले, “आमच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात करण्याची घोषणा
करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. फुकेत
आणि माले ही महत्त्वाची पर्यटन स्थळे आहे आणि तिथे पाहण्यासारखे भरपूर काही आहे.
एलसीसी या नात्याने, आम्ही आमच्या ग्राहकांना त्याच्या पैशाचा योग्य मोबदला
देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आणि आता आम्ही आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरिता
आमच्या सेवेचा विस्तार करत आहोत.
ग्राहकांना जलद आणि सुलभ सेवा देता यावी आणि आमच्या उत्कृष्ट सेवा
देण्याच्या मार्गावर चालत रहाणे प्रतिबिंबित व्हावे यासाठी आंतरराष्ट्रीय
वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले आहे.”
कंपनीच्या www.GoAir.in या संकेतस्थळावर किंवा ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टल, गोएअर कॉल
सेंटर, विमानतळ तिकिटिंग ऑफिसेस, परदेशातील गोएअर जीएसए कार्यालये, ट्रॅव्हल
एजंट्स आणि अॅपल आयओएस तसेच गुगल अॅन्ड्रॉईड वरील गोएअर मोबाईल अॅप येथे नवीन
विमानांची तिकीटे उपलब्ध आहेत.
विमानांचे वेळापत्रक-
|
पासून
|
पर्यंत
|
प्रस्थान (स्थानिक )
|
आगमन (स्थानिक)
|
दिवस
|
आरंभ
|
|
दिल्ली
|
फुकेत
|
01:10
|
07:25
|
गुरु, रवि
|
11 ऑक्टो 2018
|
|
फुकेत
|
दिल्ली
|
08:30
|
11:55
|
बुध,
शनिवार
|
13 ऑक्टो 2018
|
|
मुंबई
|
फुकेत
|
01:25
|
07:25
|
सोम,
बुध,
शनिवार
|
13 ऑक्टो 2018
|
|
फुकेत
|
मुंबई
|
08:30
|
12:00
|
मंगळ,
शुक्र,
रवि
|
12 ऑक्टो 2018
|
|
पासून
|
पर्यंत
|
प्रस्थान (स्थानिक )
|
आगमन (स्थानिक)
|
दिवस
|
आरंभ
|
|
मुंबई
|
माले
|
13:30
|
15:50
|
मंगळ,
शुक्र,
रवि
|
14 ऑक्टो 2018
|
|
माले
|
मुंबई
|
16:50
|
20:00
|
मंगळ,
शुक्र,
रवि
|
14 ऑक्टो 2018
|
|
दिल्ली
|
माले
|
12:45
|
16:20
|
बुध,
शनिवार
|
17 ऑक्टो 2018
|
|
माले
|
दिल्ली
|
17:20
|
22:10
|
बुध,
शनिवार
|
17 ऑक्टो 2018
|
गोएअर
संबंधी
गोएअरची
सुरुवात नोव्हेंबर 2005 मध्ये झाली. वाडिया
समूहाचा विमान प्रवासाचा गोएअर हा पहिलाच प्रयत्न असून सध्या ते 23 ठिकाणी आपली सेवा देऊ करतात. दर आठवड्याला
त्यांच्या 1544 विमानांचे उड्डाण होते आणि दर आठवड्याला
साधारण 2000 हून अधिक ठिकाणी ते सेवा देतात. ही विमान कंपनी त्यांच्या ग्राहकांच्या सर्वोत्कृष्ट सुरक्षेची हमी
घेण्यासाठी अत्याधुनिक A320 आणि A320neo विमान ताफ्यांचा वापर करते.
उत्कृष्ट
ग्राहक सेवा आणि किफायतशीर विमान भाडे देऊन ग्राहकांना त्यांच्या पैशांचा योग्य
मोबदला देऊ करण्यासठी गोएअर वचनबद्ध आहे. ‘स्मार्ट पीपल्स एअरलाईन्स’ या
तत्त्वाचा अवलंब करण्यासाठी आवश्यक बाबींची योग्य दाखल घेऊन दरवेळी सुरक्षित आणि
कार्यक्षम वाहतूक देण्यासाठी विमानकंपनी कटिबद्ध आहे. विविध
सेवा-सुविधांची शृंखलाच उपलब्ध करून इकोनॉमी आणि बिझनेस प्रवाशांसाठी विमान
प्रवासाचा आनंद द्विगुणीत करत गोएअर ‘फ्लाय स्मार्ट’ या त्यांच्या वचनाचे पालन करते.
विमान
कंपनीची सेवा अहमदाबाद, बागडोग्रा, बंगळूरू, भुवनेश्वर, चंडीगड,
चेन्नई, दिल्ली, गोवा,
गुवाहाटी, जयपूर, जम्मू,
कोच्ची, कोलकाता, लेह,
लखनऊ, मुंबई, नागपूर, पटना, पोर्ट ब्लेअर,
पुणे, रांची, श्रीनगर
आणि हैदराबाद येथे उपलब्ध आहे. ऑक्टोबर 2018 पासून गोएअर आंतरराष्ट्रीय विमान सेवेत पदार्पण करणार असून फुकेत आणि माले
येथे थेट विमान सेवा देऊ करणार आहे.
Comments
Post a Comment