एडलवाईज जनरल इन्शुरन्सच्या आगळ्यावेगळ्या आरोग्य विमा योजनेचे सादरीकरण
एडलवाईज जनरल इन्शुरन्सच्या आगळ्यावेगळ्या आरोग्य विमा योजनेचे सादरीकरण
भारतभरातील विपणनासाठी पॉलिसीबझारशी भागीदारी
एडलवाईज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (भारतातील अग्रेसर वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा फर्म्सपैकी एक) सामान्य विमा शाखेने एडलवाईज आरोग्य विमा सुविधेचे सादरीकरण केले आहे. ही अत्यंत व्यापक आरोग्य विमा पॉलिसी असून यात ग्राहकाभिमुख वैशिष्ट्ये व सेवांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. एडलवाईज जनरल इन्शुरन्सचे सादरीकरण या वर्षी सुरूवातीला करण्यात आले असून नॉन-लाईफ इन्शुरन्स बाजारपेठेसाठी यातून सेवा पुरवण्यात येत आहेत.
पॉलिसीबझार या भारतातील सर्वांत मोठ्या विमा वेब भागीदारांशी कंपनीने भागीदारी केली असून या माध्यमातून सदर उत्पादनाचे भारतभर विपणन करण्यात येणार आहे. पॉलिसीबझारच्या माध्यमातून भारतभरातील ग्राहकांना सदर योजनेची माहिती मिळू शकणार असून ही आरोग्य विमा योजना ऑनलाईन खरेदी करताही येणार आहे.
एडलवाईज आरोग्य विमा योजनेची ठळक वैशिष्ट्ये –
- तीन योजनांचे पर्याय – सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम – 1 कोटींपर्यंतचे कव्हर उपलब्ध
- व्यक्तीगत प्रकारांत 8 सदस्यांपर्यंत कव्हर (पालक, सासू-सासरे, आजी-आजोबा आणि भावंडांचा समावेश) आणि कौटुंबिक फ्लोटर प्रकारात 5 सदस्यांचा समावेश (योजनाधारक व्यक्ती, पती किंवा पत्नी व तीन अपत्ये)
- 100 टक्क्यांपर्यंत सम इन्शुअर्डसह आयुष उपचारांचा अंतर्भाव, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी यांसारख्या पर्यायी थेरपींची गरज लक्षात घेता नवा ट्रेण्ड सादर
- रुग्णालयातील सर्व उपचारांचा एक मोठा भाग असलेली डे-केअर सर्जरी अंतर्भूत, संपूर्ण विम्याच्या रकमेपर्यंत 388 पेक्षा जास्त व्याधींसाठी कव्हरेज समाविष्ट आहे.
- वजन कमी करण्यासाठीची बेरिएट्रिक शस्त्रक्रियाही यात समाविष्ट होते. हे वैशिष्ट्य बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मोजक्या योजनांमध्ये समाविष्ट आहे.
- या योजनेत अवयव दान प्रक्रियेचाही समावेश होत असून दात्याला 2 लाखांपर्यंत हॉस्पीटलायझेशन रक्कम मिळू शकते.
- पहिल्या दोन प्रसुतींसाठीच्या खर्चाचा समावेश होतो.
- कोणताही दावा बोनस दर क्लेम-मुक्त वर्षानंतर जास्तीत-जास्त 100% पर्यंत विम्याच्या रकमेत वाढ होते.
- विम्याची रक्कम संपत असल्यास उपलब्ध पुनर्संचयन आणि रिचार्जचा लाभ
नव्या सादरीकरणाबाबत बोलताना एडलवाईज जनरल इन्शुरन्सचे सीईओ अनूप राऊ म्हणाले, “ग्राहक नेहमीच आमच्या उत्पादनांच्या केंद्रस्थानी आहेत. आमचे उत्पादन अतिशय व्यापक आणि समृद्ध वैशिष्ट्यांसह आहे. ग्राहकांच्या उदयोन्मुख गरजा लक्षात ठेवून ते डिझाइन केलेले आहे. ग्राहकांना माहितीपूर्ण निवडी करण्यास सक्षम करण्यासाठी उत्पादन वैशिष्ट्यांचे अगदी सोप्या भाषेत वर्णन केले गेले आहे. पॉलिसीबझारद्वारे, आमच्या या नवीन उत्पादना सोबत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय आहे.’’
पॉलिसीबझार ग्रुप ऑफ कंपनीजचे सहसंस्थापक व सीईओ याशिष दहिया म्हणाले, “आम्ही नव्या उत्पादनासाठी एडलवाईज जनरल इन्शुरन्ससोबत भागीदारी केली असून आमच्या स्थापनेपासूनच एडलवाईज ग्रुप नेहमीच आमचा एक अमूल्य भागीदार राहिला आहे. एडलवाईज जनरल इन्शुरन्स आमच्या संस्थापक मंडळावर येत असताना, आम्ही आरोग्य आणि मोटर इन्शुरन्स क्षेत्रामध्ये आमची उत्पादन श्रेणी अधिक मजबूत करणार आहोत. नवीन आरोग्य विमा उत्पादन एक अद्वितीय वैशिष्ट्यासह येत आहे. यातून ग्राहकाला एकूण विम्याच्या पुनर्संचयन आणि रिचार्ज रायडरची निवड करण्यास मदत होणार असून त्यांना हितकारक आणि कमी प्रभावी प्रस्ताव प्राप्त करता येईल.’’
हे उत्पादन ग्राहकांना त्यांच्या कोणत्या गोष्टींची खरोखर गरज आहे हे सांगण्यासाठी एडलवाईज जनरल इन्शुरन्स महत्वाची भूमिका बजावते. कंपनीचा असा विश्वास आहे की विमाप्रक्रिया अधिक सोपी आणि ग्राहकास अनुकूल असणे आवश्यक आहे. या सोपेपणात संभाव्य ग्राहकाने पॉलिसीबद्दल विचारणा केली असेल त्या क्षणापासून ती योजना संपेपर्यंतच्या सर्वच गोष्टींचा समावेश व्हायला हवा.
Comments
Post a Comment