गुंजन जैन यांनी लॅक्मे फॅशन वीक २०१८ मध्ये 'योगीनी' हे वृक्ष विंटर फेस्टिव्ह कलेक्शन सादर केले
गुंजन जैन यांनी लॅक्मे फॅशन वीक २०१८ मध्ये 'योगीनी'
हे वृक्ष विंटर फेस्टिव्ह कलेक्शन सादर केले
गुंजन जैन या दिल्लीमधील असून त्या पर्ल अकादमी ऑफ फॅशन च्या माजी विद्यार्थिनी आहेत. ओरिसामधील प्रख्यात ६४ योगिनी मंदिरापासून प्रेरित गुंजन जैन यांच्या 'योगीनी' या कलेक्शनसाठीअभिनेत्री रसिका दुगल यांनी रॅम्पवॉक केला. वोग फॅशन फंडच्या डिझायनर ऑफ दि इयर ने सन्मानित गुंजन जैन यांच्या वृक्ष स्टुडिओचे हे कलेक्शन आहे. या कलेक्शनमधील खादी तुस्सर रेशमीसाड्यांवर प्रथमच करण्यात आलेले अतिशय सुंदर अशा इकत आणि जाला वीण यांचे मिश्रण हे या कलेक्शनचे नावीन्य आहे. हे कलेक्शन लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्ह २०१८ च्या दुसऱ्या दिवशीसस्टेनेबल फॅशन डे या संकल्पने अंतर्गत दिनांक २३ ऑगस्ट २०१८ रोजी सादर करण्यात आले.

Comments
Post a Comment