'डेस्टिनेशन उत्तराखंड: इन्व्हेस्टर्स समिट २०१८' उत्तराखंड सरकारने घातली महाराष्ट्रातील व्यापार विश्वाला साद
'डेस्टिनेशन उत्तराखंड: इन्व्हेस्टर्स समिट २०१८' उत्तराखंड सरकारने
घातली महाराष्ट्रातील व्यापार विश्वाला साद
~ डेहराडून येथे ७ ऑक्टोबर पासून
सुरू होणाऱ्या 'डेस्टिनेशन उत्तराखंड-इन्व्हेस्टर्स
समिट १८' चे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ~
उत्तराखंड सरकारने ७-८ ऑक्टोबर २०१८ दरम्यान आयोजित केलेल्या 'डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट' या शिखरपरिषदेची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आज मुंबईमध्ये एका रोड शोचे
आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंड राज्याची ही पहिलीच शिखर
परिषद डेहराडून येथे पार पडणार असून माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते तिचे उद्घाटन होणार आहे.
उत्तराखंडचे माननीय मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्र सिंग रावत आणि श्री. सत्पाल महाराज, पर्यटन मंत्री, उत्तराखंड सरकार यांनी या रोड शोला संबोधित केले. मुंबईमध्ये झालेल्या या सभेसमोर उत्तराखंड
सरकारमधली काही वरीष्ठ उच्चपदस्थांनीही आपले विचार मांडले. यात
मुख्य सचिव श्री. उत्पल कुमार सिंग, उद्योग
विभागाच्या प्रधान सचिव श्रीम. मनिषा पानवर, फायनान्स
सचिव श्री. अमित नेगी, पर्यटन खात्याचे सचिव श्री. दिलिप जावळकर, विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान खात्याचे सचिव श्री. रवीनाथ रमण, उद्योग
विभागाच्या महासंचालक, आणि उत्तराखंड सरकारच्या राज्य उद्योग
विकास महामंडळाच्या (SIIDCUL) व्यवस्थापकीय संचालक आयुक्त श्रीम. सौजन्या यांचा समावेश होता. उत्तराखंड सरकारमधील या
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक अग्रमानांकित व्यक्ती तसेच
भारतीय चित्रपट उद्योगाविषयीचे काही विख्यात तज्ज्ञही या कार्यक्रमाला उपस्थित
राहिले. या मान्यवरांमध्ये रिलायन्स
इंडस्ट्रीज लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री मुकेश अंबानी, सीआयआय महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष
व ब्लु स्टार लि.चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन, टाटा मोटर्स लि.च्या
सरकार आणि सार्वजनिक कामकाज विभागाचे राष्ट्रीय प्रमुख श्री. सुशांत नाईक, एव्हीएडीएए ग्रूपचे अध्यक्ष श्री.
विनीत मित्तल, वेरटिव एनर्जी प्रा. लि,चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.
सुनील खन्ना, अध्यक्ष श्री. अरुण नंदा, महिंद्रा हॉलिडेज अँड रीसॉर्ट्स इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. कविंदर सिंग,
महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आणि सीपीओ श्री. हेमंत
सिक्का, क्राफ्ट हेन्झ कंपनी लि.चे भारत,
बांग्लादेश आणि नेपाळचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संकल्प पोठबरे, आरपीजी एंटरप्राइजेसचे अध्यक्ष श्री.
हर्ष गोएंका, हिंदुजा ग्रूपच्या सीपीएमचे प्रमुख
श्री. आर कन्नन, हिंदुजा रिन्युएबल पॉवरचे
सीईओ श्री. कपिल महेश्वरी, हिंदुजा हाऊसिंग
फायनान्सचे सीओओ श्री. वेंकटचलाम कन्नपन, अशोक लेलँड लि.च्या फायनान्स विभागाचे डीजीएम श्री.
मणिशंकर घोष जॉन्सन अँड जॉन्सन च्या सरकारी कामकाज आणि धोरणाचे सहाय्यक संचालक
श्री अमीत वर्मा , प्लास्टिक पार्क चे अध्यक्ष
श्री हितेश भेडा व चेयरमॅन श्री जयेश राम्भा, एम सी चे अध्यक्ष श्री मनीष देढिया, ऑल
इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशन चे प्रमुख सल्लागार श्री दीपक बलानी,
झी लर्न लिमिटेड, एस्सेल ग्रुपचे कार्यकारी
संचालक श्री अजेय कुमार, ताज हॉटेल चे कार्यकारी उपप्रमुख
श्री रोहित खोसला, विवासवान इंटरनॅशनल चे श्री के. एस. सर्वन,
फर्न बाम्बू प्रायव्हेट लिमिटेड च्या श्रीमती इंद्राणी मुखर्जी,
द वाइल्डफ्लोवर रिसॉर्ट अँड
स्पा चे श्री तरुण गिरी यांचा समावेश होता.
उत्तराखंड सरकारच्या शिष्टमंडळाला भारतीय चित्रपट उद्योगातील दिग्गज भेटले आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यांमध्ये
विशेष फिल्म्सचे निर्माता आणि दिग्दर्शक श्री. महेश भट्ट, मुक्ता
आर्ट्सचे
निर्माता आणि दिग्दर्शक श्री. सुभाष घई, केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्ड, मुंबईचे अध्यक्ष श्री. प्रसून जोशी, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याअंतर्गत येणाऱ्या नॅशनल फिल्म
डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या फिल्म फेलिसिटेशन ऑफिसचे प्रमुख श्री. विक्रमजीत, करोल बाग प्रोडक्शन्सचे दिग्दर्शक श्री.
सतिश कौशिक, भारतीय चलत् चित्र निर्माता
संघाचे अध्यक्ष श्री. टी.पी. अगरवाल, संगीतकार व पार्श्वगायक श्री. अनु मलिक, अभिनेता सोनू सूद, पार्श्वगायिका
श्रीम. अनुराधा पौडवाल आदींचा समावेश होता.
उत्तराखंडमधील गुंतवणुकीच्या संधींची माहिती
करून देणे व 'डेस्टिनेशन उत्तराखंड-इन्व्हेस्टर्स समिट २०१८' साठी लोकांचा सक्रिय सहभाग
मिळविणे हे या रोड शोमागचे प्रमुख उद्दीष्ट होते. या रोड
शोला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला व त्यातून मुंबईतील गुंतवणूकदार आणि
चित्रपटकर्मींमध्ये उत्तराखंडमधील गुंतवणूक संधींबद्दल व शिखर परिषदेबद्दल मोठी
उत्सुकता निर्माण झाली. या रोड शोसाठी उत्तराखंड सरकारच्या
शिष्टमंडळाने राज्यातील अन्नप्रक्रिया, फलोत्पादन व फुलांची
लागवड, वनौषधी व सुगंधी वनस्पती, पर्यटन
आणि हॉस्पिटॅलिटी, स्वास्थ्य आणि आयुष (AYUSH), औषधनिर्मिती, वाहननिर्मिती, नैसर्गिक
फायबर्स, आयटी, पुनर्नविकरणीय ऊर्जा,
जैवतंत्रज्ञान आणि चित्रपटांचे चित्रीकरण अशा १२ लक्षवेधी
क्षेत्रांची माहिती उपस्थितांना दिली.
या रोड शोबद्दल बोलताना उत्तराखंडचे माननीय
मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्र सिंग रावत म्हणाले,
''महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाचे मान्यवर प्रतिनिधी आणि चित्रपट
क्षेत्रातील मंडळी 'डेस्टिनेशन उत्तराखंड समिट २०१८'शी जोडली गेली आहेत ही गोष्ट आमच्यासाठी आनंदाची आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे व मनोरंजनाचे मुख्य केंद्र आहे.
राज्यातील गुंतवणूकदार या उपक्रमात सहभागी झाल्याने उत्तराखंडला
गुंतवणूकदार आणि चित्रपट निर्मात्यांसाठीचे एक लोकप्रिय गंतव्यस्थान बनविण्याच्या
दृष्टीने चाललेल्या आमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले आहे. आमच्या राज्यामध्ये गुंतवणूकदारस्नेही धोरणे राबविण्यात येत असून औद्योगिक
विकासासाठी पोषक अशी परिसंस्था विकसित करण्यात आली आहे.''
रोड शोच्या दरम्यान श्री. सत्पाल महाराज, पर्यटन मंत्री म्हणाले, ''आपल्या माननीय मुख्यमंत्र्याच्या
दृष्टिकोनानुसार आणखी एक पाऊल पुढे टाकत, आपण सर्व आज येथे उत्तराखंड राज्यासोबत भागिदारी करण्याकरिता उपलब्ध शक्यता पाहण्याकरिता
आणि त्यांचा शोध घेण्याकरिता एकत्र आलो आहोत. पर्यटन उत्तराखंडमध्ये
आर्थिक विकास आणि उपजिविका वाढवण्याचे एक प्रमुख कारक आहे. २०१५-१६ वर्षामध्ये
एकूण निव्वळ स्थानिक उत्पादन (जीएसडीपी)मध्ये सेवा विभागाचे योगदान ३४ टक्के
होते. राज्य पर्यटन विभागाच्या विकासाबाबत गंभीर आहे. हल्लीच, गुंतवणूकदारांना एमएसएमई व मेगा औद्योगिक
धोरणांतर्गत सर्व इंसेन्टिव्ह्जचा लाभ घेण्यामध्ये मदत करण्याकरिता आम्ही
पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला आहे.''
उत्तराखंडमधील गुंतवणुकीच्या संधींची माहिती
करून देणे व 'डेस्टिनेशन उत्तराखंड-इन्व्हेस्टर्स समिट २०१८' साठी लोकांचा सक्रिय सहभाग
मिळविणे हे या रोड शोमागचे प्रमुख उद्दीष्ट्य होते. या रोड
शोला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला व त्यातून मुंबईतील गुंतवणूकदार आणि चित्रपटकर्मींमध्ये
उत्तराखंडमधील गुंतवणूक संधींबद्दल व शिखर परिषदेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली.
या रोड शोसाठी उत्तराखंड सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यातील
अन्नप्रक्रिया, फलोत्पादन व फुलांची लागवड, वनौषधी व सुगंधी वनस्पती, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी,
स्वास्थ्य आणि आयुष (AYUSH), औषधनिर्मिती,
वाहननिर्मिती, नैसर्गिक फायबर्स, आयटी, पुनर्नविकरणीय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान
आणि चित्रपटांचे चित्रीकरण अशा
१२ लक्षवेधी
क्षेत्रांची माहिती उपस्थितांना दिली.
या रोड शोबद्दल बोलताना उत्तराखंडचे माननीय
मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्र सिंग रावत म्हणाले,
''महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाचे मान्यवर प्रतिनिधी आणि चित्रपट
क्षेत्रातील मंडळी 'डेस्टिनेशन उत्तराखंड समिट २०१८'शी जोडली गेली आहेत ही गोष्ट आमच्यासाठी आनंदाची आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे व मनोरंजनाचे मुख्य केंद्र आहे.
राज्यातील गुंतवणूकदार या उपक्रमात सहभागी झाल्याने उत्तराखंडला
गुंतवणूकदार आणि चित्रपट निर्मात्यांसाठीचे एक लोकप्रिय गंतव्यस्थान बनविण्याच्या
दृष्टीने चाललेल्या आमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले आहे. ''
रोड शोमध्ये उपस्थित अग्रणी उद्योजकांशी संवाद साधताना उत्तराखंड
सरकारचे मुख्य सचिव श्री. उत्पल कुमार सिंग म्हणाले, ''उत्तराखंडकडे औद्योगिक विकासाच्या
वैविध्यपूर्ण शक्यता आहेत. त्यांना कणखर पायाभूत सुविधांची
तसेच गुंतवणूदारस्नेही धोरणांची जोड देण्यात आली आहे. व्यापारसुलभतेच्या
परिमाणांचे मापन करणाऱ्या Ease of Doing Business निकषांनुसार
आपले धोरण आखणाऱ्या या तरुण राज्याकडे स्टार्ट-अप
कंपन्यांसाठी तसेच उदयोन्मुख उद्योजकांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. उत्तराखंडला गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण बनविण्यासाठी महाराष्ट्रातील
व्यापारीवर्गाबरोबर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.''
उद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीम. मनिषा पानवर म्हणाल्या.
''व्यापारवर्ग आणि चित्रपट उद्योगातील मंडळींना आमच्या राज्यात
गुंतवणुकीसाठी निमंत्रित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. राज्यात चित्रपट निर्मितीसाठी सर्वोत्तम मंच उपलब्ध करून देण्यासाठी
उत्तराखंड सरकारने फिल्म सिटी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे तसेच
चित्रिकरण शुल्क माफ केले आहे. नयनरम्य सौंदर्याने नटलेल्या
या राज्याकडे चित्रपट निर्मात्यांच्या आगामी प्रकल्पांसाठी चित्रिकरणस्थळांचे
भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.''
उत्तराखंड
सरकारच्या पर्यटन विभागाचे सचिव श्री.
दिलिप जावळकर म्हणाले, ''बर्फाच्छादित डोंग, रंगीबेरंगी फुलेफळे, अप्रतिम तलावं… उत्तराखंडमध्ये अप्रतिम निसर्गसौंदर्याची अनेक ठिकाणं आहे. त्यामुळे, सिनेमांच्या चित्रीकरणासाठी हे एक योग्य स्थळ
ठरेल. या राज्यात चित्रिकरणासाठी चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्याच्या
हेतूने चित्रीकरणासाठी असलेल्या आमच्या खास योजनांच्या माध्यमातून आम्ही सवलती देत
आहोत. सर्व प्रकारच्या चित्रीकरणावरील चित्रीकरण शुल्क रद्द करण्याचा
निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. स्थानिक सिनेमाचा विकास
करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 'उत्तराखंड फिल्म डेव्हलपमेंट
कौन्सिल (यूएफडीसी)चीही स्थापना केली आहे.
यात चित्रपटसृष्टीतील २५ सदस्यांचा समावेश आहे.'''
गुंतवणूकदारांना राज्याच्या विविध
व्यापारक्षेत्रांक़डे आकर्षित करण्यासाठी व त्याअन्वये एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये आपले
योगदान देण्यासाठी उत्तराखंड सरकारने अनेक धोरणात्मक उपक्रम हाती घेतले आहेत. सूक्ष्म, लघु आणि
मध्यम उद्योगांसाठीचे एमएसएमई धोरण २०१५ आणि गुंतवणूक धोरण, २०१५ यांच्या जोडीने राज्यातील औद्योगिक
वातावरणास चालना देण्यासाठी तसेच व्यापारमार्गदर्शनाच्या हेतूने विविध
उद्योगक्षेत्रांकडे विशेषत्वाने लक्ष पुरविणारी धोरणेही आखण्यात आली आहेत. चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी राज्याची निवड करण्यास निर्मात्यांना
प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने उत्तराखंड चित्रपट विकास परिषद (UFDC) ची स्थापना केली आहे. या
संघटनेमध्ये चित्रपटक्षेत्राशी संबंधित २५ सदस्यांचा समावेश असून स्थानिक सिनेमाचा
विकास हे तिचे उद्दीष्ट आहे. एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून
प्रांताची लोकप्रियता वाढविण्यासाठी उत्तराखंड सरकाने या राज्यात चित्रित होणाऱ्या
सर्व चित्रपटांसाठी चित्रीकरण शुल्क माफ केले आहे. उत्तराखंड
सरकारने निर्धारित जागी फिल्म सिटी उभारण्यावर लक्ष केंद्रित केले असून
बाह्यचित्रीकरणासाठीच्या जागांची निवड व विकास यांच्यावरही भर दिला जात आहे.
उत्तराखंड राज्यात गुंतवणूक करणे महाराष्ट्रातील उदयोन्मुख
उद्योजकांसाठी भौगोलिकदृष्ट्या फायद्याचे आहे. हे राज्य देशाच्या राजधानी क्षेत्रापासून जवळ असून राजधानीशी उत्तम
संपर्कमार्गांनी जोडलेले आहे. त्यामुळे राजधानी क्षेत्रातील
महत्त्वपूर्ण ग्राहक बाजारपेठेच्या गरजा राज्यातील उद्योगांकडून पुरविल्या जाऊ
शकतात. राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक परिसर हे अमृतसर
कोलकाता औद्योगिक महामार्गाच्या पट्ट्यामध्ये येतात ज्यामुळे नव्या संधी निर्माण
होण्यास वाव आहे. बऱ्याच काळापासून इथे असलेल्या प्रतिष्ठित व्यापारगृहांमुळे या
राज्याला एक सुस्थापित औद्योगिक पायाही लाभला आहे ज्यांची पूरक निर्मितीकेंद्रे
राज्यातील उधम सिंग नगर, हरिद्वार इत्यादी भागांत मोठ्या संख्येने
कार्यरत आहे. स्थानिक उत्पादन परिसंस्थेच्या आधारे अद्ययावत
कार्यपद्धती अंमलात आणणाऱ्या व्यापारस्नेही वातावरणामुळे अनेक प्रमुख कंपन्यांनी
उत्तराखंडमध्ये आपली केंद्रे स्थापन केली आहेत.
डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट २०१८
उत्तराखंड सरकारतर्फे ७-८ ऑक्टोबरदरम्यान 'उत्तराखंड इन्व्हेस्टर्स समिट २०१८'चे आयोजन केले जात आहे.
राज्याकडून विकासाच्या हेतूने निवडल्या गेलेल्या सर्व १२ उद्योगक्षेत्रांशी
संबंधित खात्यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविला जात आहे. उद्योग
संचालनालयातील गुंतवणूक प्रोत्साहन व मार्गदर्शन केंद्र या उपक्रमासाठी सचिवालय
म्हणून काम पहात आहे. हा एक भव्य कार्यक्रम असणार असून
त्यानिमित्ताने गुंतवणूकदार, उत्पादक, निर्माते,
धोरणकर्ते आणि विश्व व्यापार परिसंस्थेचा भाग असलेल्या संघटनांचा
मेळावा भरणार आहे. या शिखर परिषदेमध्ये अन्नप्रक्रिया, फलोत्पादन व फुलांची लागवड, वनौषधी व सुगंधी वनस्पती,
पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी, स्वास्थ्य आणि आयुष (AYUSH),
औषधनिर्मिती, वाहननिर्मिती, नैसर्गिक फायबर्स, आयटी, पुनर्नविकरणीय
ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि चित्रपटांचे चित्रीकरण अशा १२ क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे देशातील तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना या १२ क्षेत्रांतील
गुंतवणूकीच्या तसेच व्यापाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
शिखर परिषदेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया www.destinationuttarakhand.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Comments
Post a Comment