जॅकलिन फर्नांडीस डाबर हनीची नवी ब्रँड अॅम्बेसेडर

जॅकलिन फर्नांडीस डाबर हनीची नवी ब्रँड अॅम्बेसेडर
‘स्टे फिट, फील यंग’ या मोहिमेद्वारे जॅकलिन करणार ‘डाबर हनी’ चा प्रसार
भारतातील सर्वात विश्वसनीय आरोग्यवर्धक उत्पादने बनविणाऱ्या डाबर इंडिया ने आज डाबर हनी साठी बॉलीवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडीस हीची  ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. जॅकलिन आता डाबर हनी चा प्रसार करणार असून लवकरच तिच्या उपस्थितीत ‘स्टे फिट, फील यंग’ या मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे.


दरम्यान, ”जॅकलिन फर्नांडिसच्या रूपाने डाबर हनी ला नवा  चेहरा मिळाला आहे. याबद्दल आम्ही आनंदी आहोत”  अशी भावना डाबर इंडिया लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत अग्रवाल यांनी व्यक्त केली. नवीन जीवनशैली आणि  आहाराच्या माध्यमातून आज भारतीय नागरिक स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दशकांपासून डाबर हनी आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. दररोज सकाळी गरम पाण्यात मिश्रण करून अथवा नाष्ट्याबरोबर किंवा जेवणामध्ये डाबर हनीचा समावेश सध्या साखरेला पर्याय म्हणून केला जात आहे असे अग्रवाल यांनी सांगितले.

जॅकलिन फर्नांडीस हिने डाबर हनी सोबत सहयोगाबाबत सांगितले की, “जेव्हा डाबर ने मला त्यांचे डाबर हनी या उत्पादनाच्या प्रसारासाठी सहयोग देण्याविषयी संपर्क साधला तेव्हा या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधणे मला नेहमीच आवडणार अशी आशा मी त्यांच्याकडे व्यक्त केली,  स्टे फिट, फील यंग’ या मोहिमेसाठी सुध्दा मी त्यांना तत्काळ होकार दिला.” तंदरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम, आरोग्यदायी आहार, आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. मात्र सोबतच दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात डाबर हनी सुध्दा घेणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे डाबर हनी चा प्रसार करण्यास आणि त्यांच्यासोबत सलग्न होण्यास आनंद होत आहे.”  अशी भावना जॅकलिन ने व्यक्त केली.

“आरोग्याच्या दृष्टीने ‘फिट’ म्हणून प्रतिमा असलेले  एम एस धोनी , बिपाशा बासू, शिल्पा शेट्टी यांचे डाबर हनीला काळानुरूप सहकार्य लाभले. हीच परंपरा पुढे नेत डाबर हनीच्या प्रसारासाठी तंदुरुस्त अशा जॅकलिन फर्नांडिसला ब्रँड अँबेसॅडर पदी नियुक्त करताना आनंद होत आहे” असे अग्रवाल यांनी सांगितले. “जॅकलिन हीची अभिनेत्री म्हणून ओळख तर आहेच सोबत ती तंदुरुस्त देखील आहे. सुदृढ असलेल्या जॅकलिन च्या तंदुरुस्तीपासून प्रेरणा घेऊन ग्राहक डाबर हनी ला नेहमीच स्वीकार करतील” अशी आशा प्रशांत अग्रवाल यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार