ग्रोअर अॅण्ड वेल (इंडिया) लिमिटेडतर्फे वायर इंडिया २०१८ मध्ये प्रभावी उत्पादनांचे प्रदर्शन
ग्रोअर अॅण्ड वेल (इंडिया) लिमिटेडतर्फे वायर इंडिया २०१८ मध्ये प्रभावी उत्पादनांचे प्रदर्शन ग्रोअर अॅण्ड वेल (इंडिया) लिमिटेडने मुंबईमध्ये २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वायर व केबल इंडस्ट्रीसाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ' वायर इंडिया २०१८ ' मध्ये सहभाग घेतला. प्रदर्शनाचे हे सातवे पर्व होते. हे प्रदर्शन वायर्स व केबल्स , ऑप्टिकल फायबर केबल्स , स्क्रू , स्प्रिंग्ज , वायर रोप्स आणि इतर वायर उत्पादनांच्या निर्मितीसाठी साहित्य , मशिनरी आणि उपकरणाची सेवा देते. ग्रोअर अॅण्ड वेल (इंडिया) लिमिटेडने ल्यूब व इंजीनिअरिंगशी संबंधित प्रसिद्ध उत्पादनांच्या रेंजला प्रदर्शित केले. कंपनी ग्रोडल ब्रॅण्ड नावांतर्गत विविध औद्योगिक उपयोजनांसाठी विशेष ल्युब्रिकण्ट्स व तेलांची विस्तृत रेंज सादर करते. आधुनिक व अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या वापरासह उत्पादने उच्च कामगिरी करण्यासाठी आणि मूल्यानुसार सोल्यूशन्स देण्यासाठी तयार करण्यात येतात. सर्व उत्पादने पर्यावरणास अनुकूल असण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जा...