शाळकरी मित्र भेटीचा सुवर्णकांचन योग
शाळकरी मित्र भेटीचा सुवर्णकांचन योग ५ आणि ६ जानेवारी २०१९ हे दोन दिवस आम्हा बोरिवली( पूर्व ) येथील गोपालजी हेमराज हायस्कूलमधील १९६९ साली शालांत परिक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावेत असे उगवले. कारण होतं शाळा सोडल्यानंतर तब्बल ५० वर्षांनी होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी पुनर्भेटीचं . हे स्नेह सम्मेलन निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ॲम्बी व्हॅलीत स्थित आमच्या एका मित्राच्या बंगल्यावर संपन्न झालं . आमच्यापैकीच एका उत्साही वर्ग मित्राने एक व्हाटसप समुह स्थापून एवढ्या मोठ्या कालावधीत इत:स्तता विखुरलेल्या मित्रांना एकत्र आणण्याचे महत्वाचे काम केले , तर काही जणांनी सातत्यपूर्वक पाठपुरावा करुन या कार्यक्रमास मूर्त स्वरुप आणले होते . परिणामतः कार्यक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता . बऱ्याच वर्षांनी भेट होत असल्यामुळे प्रत्येकात आमुलाग्र बदल झालेला दिसून येत होता . काही जण तर ओळखूही येत नव्हते इतके वेगळे दिसत होते . मात्र पुनर्भेटीचा एक अनोखा आनंद प्रत्येक जण अनुभवत होता . प्रत्येकाला एकमेकां...