ओडिशा टुरिझम तर्फे भारतातील बेस्ट केप्ट सिक्रेट असलेल्या पर्यटन योजनांचे प्रदर्शन
ओडिशा टुरिझम तर्फे भारतातील बेस्ट केप्ट सिक्रेट असलेल्या पर्यटन योजनांचे प्रदर्शन मुंबई २९ जून २०१९- ओडिशाचे पर्यटन मंत्री श्री जे पी पाणिग्रही यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने फिक्की द्वारा मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका रोड शो मध्ये भाग घेतला. या रोड शो मध्ये मुंबईतील १५० टुर ॲन्ड ट्रॅव्हल व्यवसायिक सहभागी झाले होते व त्यांना या शिष्टमंडळाचा भाग असलेल्या ओडिशातील १८ आघाडीच्या टूर ऑपरेटर्स बरोबर बी२बी नेटवर्किंग करण्याची संधी मिळाली. कमिशनर कम सेक्रेटरी श्री विशाल देव यांनी ओडीशा मधील हेरिटेज टुरिझम, इकोटुरिझम, एथनिक टुरिझम आणि स्पिरिच्युअल टुरिझम व अन्य पर्यायांवर प्रकाश टाकला.त्यांनी प्रत्येक विभागात राज्याची ब्रॅन्ड प्रतिमा जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. ते म्हणाले “ भुवनेश्वर हे भारतातील सर्वात स्मार्ट आणि राहण्यास योग्य शहरांपैकी एकअसून सातत्याने ते भारतातील तसेच जगभरांतील अन्य भागांशी जोडले जात आहे. या शहराला क्रिडा क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शहरात एशियन ॲथ...