राष्ट्रीय विज्ञान दिनी सरकारी शालेय विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या तांत्रिक नाविन्यता अन्य ३,००० मुलांना देणार प्रेरणा
राष्ट्रीय विज्ञान दिनी सरकारी शालेय विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या तांत्रिक नाविन्यता अन्य ३ , ००० मुलांना देणार प्रेरणा मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नवीन युगातील तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या प्रकल्पांचे दर्शन घडवणारी " हाय टेक एक्स्प्रेस फॉर यंग अडोलेस ंट्स " शाळा - शाळांमध्ये फिरणार मुंबई , २८ जानेवारी २०२० : दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो . भारतातील भौतिकशास्त्रज्ञ डॉ . सी . व्ही . रमण यांनी १९२८ मध्ये शोधून काढलेल्या ‘ रमण प्रभावा ’ ची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो . हे थोर शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेला हा गेल्या सहस्रकातील महत्त्वाच्या संशोधनांमध्ये गणला जाणारा शोध यांपासून प्रेरणा , घेऊन सलाम बॉम्बे फाउंडेशनने मासून या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने शुक्रवारी “ हाय टेक एक्स्प्रेस ” ला कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री श्री नवाब मलिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला . ...