सक्षम भारत अभियानांतर्गत मजबूत आर अँड डी इकोसिस्टम तयार करण्यासाठी, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सोबत एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने इंडिकॉन २०२०-२०१२ परिषदचे आयोजन

सक्षम भारत अभियानांतर्गत मजबूत आर अँड डी इकोसिस्टम तयार करण्यासाठी, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सोबत एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने इंडिकॉन २०२०-२०१२ परिषदचे आयोजन


११ शहरे, ११ परिषदा, १२आकर्षक विषय, ३२ आकर्षक सत्रे, आणि १५० पेक्षा जास्त उद्योग आणि शैक्षणिक तज्ञ

आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीत व्हर्चूवल मालिका २६ ऑक्टोबर ते २९ मे २०२१ या दरम्यान ११ सत्रे होणारआहेत  

युनेस्को सांख्यिकी संस्थेच्या अनुसार २०१९ मध्ये इस्राईलच्या ४.२%, कोरिया प्रजासत्ताक ४.3%, यूएस २.७% आणि चीनची २% यांच्या तुलनेत भारताचा अनुसंधान व विकास खर्च जीडीपीच्या १ % हुन कमी होता.

हे भारतातील अनुसंधान व विकास पर्यावरणातील एक संभाव्य अंतर आहे. या विषयावर लक्ष वेधण्यासाठी आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज नॉलेज कमिटी, एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "बिल्डींग स्ट्रॉन्गर आर अँड डी इकोसिस्टम - सक्षम भारत अभियान सक्षमीकरण" या विषयासह इंडिकॉन २०२०-२०२१ आयोजित करणार आहे.

११ शहरांचे हे संमेलन सोमवारी २६ ऑक्टोबर रोजी मुंबई - पुणे येथून सुरू होईल. श्री. राजीव पोदार - सन्माननीय अध्यक्ष, आयएमसी, श्री जुझार खोराकीवाल - सन्माननीय उपाध्यक्ष, आयएमसी, श्री. अजित मंगरुळकर - आयएमसीचे महासंचालक, श्री. राहुल व्ही. कराड - एमआयटी-डब्ल्यूपीयूचे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्यकारी अध्यक्ष, प्रो.एन.टी. राव - एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कुलगुरू, श्री. प्रवीण व्ही. पाटिल - सीआयएपी, एमआयटी-डब्ल्यूपीयू चे अध्यक्ष आणि डॉ. प्रसाद खांडेकर - आयोजन अध्यक्ष समिती, इंडिकॉन व इतर मान्यवर उपस्थित होतील.  

२६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२० या तीन दिवसचा चालणा-या इंडिकॉन २०२०-२०२१ या उद्घाटनामध्ये उद्योग, शिक्षण, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि भारतातील विविध विभाग आणि शहरांचे प्रतिनिधी असलेले इतर तज्ज्ञ उपस्थित असतील. इंडियन २०२०-२०२१ मध्ये दिल्ली, बंगळुरू, कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, गुवाहाटी, इंदूर आणि चंदीगड या शहरांचा समावेश असलेल्या आठ महिन्यांहून अधिक कालावधीत होणार्‍या संमेलनांची मालिका असेल.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार