‘इमासोल’च्या साथीने इमामीचा गृहस्वच्छता उत्पादनांच्या क्षेत्रात प्रवेश


‘इमासोल’च्या साथीने

इमामीचा गृहस्वच्छता उत्पादनांच्या क्षेत्रात प्रवेश

 

क्रिकेट स्टार शिखर धवन इमासोलचा ग्लोबल ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून करारबद्ध

 


मुंबई, १९ नोव्हेंबर २०२०:  भारताच्या एफएमसीजी क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी असलेली इमामी लिमिटेड इमासोल (EMASOL) या ब्रॅण्डनेमअंतर्गत गृहस्वच्छता उत्पादनांची एक संपूर्ण श्रेणी भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल करण्यास सज्ज झाली आहे. या श्रेणीच्या निमित्ताने, आजवर वैयक्तिक देखभालीची प्रसाधने तसेच हेल्थकेअर उत्पादनांच्या क्षेत्रातील अग्रगण्य मानले जाणारे नाव प्रथमच घरगुती देखभालीसाठीच्या उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये धमाकेदार प्रवेश करत आहे. इमासोल ही भारतीय बाजारपेठेत दाखल होणारी प्रथम होम हायजीन रेंज आहे, जी ९९% जंतू नष्ट करतेच पण त्याचबरोबर या उत्पादनांमध्ये असलेली BGV24™* अॅडव्हान्स्ड अँटीमायक्रोबियल्स अॅक्शन विषाणू, जंतू आणि बॅक्टेरिया यांच्यापासून २४ तासांपर्यंत संरक्षण पुरविते.

 

इमासोल गृहस्वच्छता उत्पादनांच्या श्रेणीच्या बाजारपेठेतील पदार्पणाबद्दल बोलताना इमामी लिमिटेडचे डायरेक्टर श्री. मोहन गोयंका म्हणाले, ‘’कोव्हिड १९ पॅनडॅमिकने लोकांची आपल्या घराच्या स्वच्छतेबद्दलची जागरुकता एका नव्या पातळीवर नेली आहे. आता सर्व आर्थिक स्तरांतील लोक घर स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतात आणि त्यासाठी वारंवार घरांची स्वच्छता केली जाते. गृहस्वच्छता क्षेत्राची उलाढाल ही जवळ-जवळ ३००० कोटी रुपये इतकी आहे. कोव्हिडपूर्व काळामध्ये त्यात दोन आकडी वाढ नोंदवली जात होती आणि येत्या काळामध्ये ती अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे. अशा सद्यस्थितीचा संदर्भ घेत इमासोल होम हायजीन उत्पादनांची श्रेणी बाजारात आणत गृहस्वच्छता उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असल्याचा अनुभव भारावून टाकणारा आहे.

 

आपल्या अनोख्या BGV24™* अॅडव्हान्स्ड अँटीमायक्रोबियल्स अॅक्शनमुळे निर्जंतुकीकरणाच्या बाबतीत इतर उत्पादनांच्या तुलनेत सरस कार्यक्षमता लाभलेल्या इमामीने आपल्या इमासोल श्रेणीचा ग्लोबल ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेटपटू शिखर धवन यास करारबद्ध केले आहे. लंडन स्थित डिझाइन फर्म इव्हॉल्व्ह क्रिएटिव्हने इमासोल होम हायजीन श्रेणीचे पॅकेजिंग बनवले आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार