ट्रेडइंडियाद्वारे 'कंझ्युमर गुड्स एक्सपो इंडिया २०२०'चे आयोजन

ट्रेडइंडियाद्वारे 'कंझ्युमर गुड्स एक्सपो इंडिया २०२०'चे आयोजन

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२०: भारतातील आघाडीच्या बी२बी बाजारपेठांपैकी एक असलेल्या ट्रेड इंडिया 'कंझ्युमर गुड्स एक्सपो २०२०' या भारतातील एमएसएमई इकोसिस्टिमसाठी जगातील सर्वात मोठ्या व्हर्चुअल एक्सपोझिशनसाठी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म तयार करत आहे. न्यू नॉर्मलमध्ये नव्या व्यवसाय संधी शोधण्यासाठी पॅकेज्ड व ड्युरेबल गुड्ससाठीचे भारतीय निर्माते, पुरवठादार, निर्यातदारांना ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणारा हा पहिलाच ट्रेड इव्हेंट मदत करेल. देशातील लघु आणि मध्यम व्यवसायिकांसाठी नव्या व्यावसायिक कल्पना आणि सहकार्याची भरभराट करण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल.

भारतातील एमएसएमई क्षेत्रातील प्रदर्शनकर्त्यांना, त्यांची विविध उत्पादने, सेवा व्हिडिटर्ससमोर प्रदर्शित करता येतील. यामुळे योग्य पुढाकाराद्वारे आकर्षक व्यावसायिक भागीदारी वाढवण्यास मदतत मिळेल. देशातील उत्पादक, पुरवठादार आणि निर्यादकांना त्यांची उत्पादने थ्रीडी प्रॉडक्ट डिस्प्लेद्वारे आंतरराष्ट्रीय ग्राहकांसमोर प्रदर्शित करता येतील. तसेच सर्वसमावेशक व्यवसाय प्रदर्शनाद्वारे उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि कमी खर्चातील बिझनेस नेटवर्किंग उभारण्यास मदत होईल. या व्हर्चुअल बिझनेस परिषदेत, अनेक महत्त्वाच्या स्टॉल्सचे प्रदर्शन असेल, जे आकर्षक सेवा व सुविधायुक्त असतील. या कार्यक्रमात स्थानिक आणि जागतिक खरेदीदारांमध्ये बिझनेस समन्वयाची शक्यता घडवून आणली जाईल, त्यासोबतच, संभाव्य ग्राहकाच्या शंका व गरजांची पूर्तता करण्यासाठीचे उपायही सुचवले जातील.

ट्रेडइंडियाचे प्रवक्ते म्हणाले, “ ग्राहकांची मागणी कोव्हिड पूर्व पातळीवर पुन्हा येत आहे. त्यामुळे भारतीय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतील लघु व मध्यम निर्यातक, खरेदीदार, विक्रेते यांना तंत्रज्ञान प्रणित प्लॅटफॉर्मची तीव्र गरज आहे. जेणेकरून त्यांना आर्थिक मंदीपासून वाचवता येईल. आमच्या फ्लॅगशिप डिजिटल प्लॅटफॉर्मवरून बहुप्रतिक्षित व्हर्चुअल कंझ्युमर गुड्स एक्सपो २०२० द्वारे आम्ही बिझनेस नेटवर्कींग आणि सहकार्यात वाढ करू. आम्हाला खात्री आहे की, हे भव्य दिव्य प्रदर्शन, लक्षणीय फरकाने मागील प्रदर्शनापेक्षा जास्त कामगिरी करेल. याद्वारे भारतीय एसएमईंना भरीव व्यवसायास मदत होईल."


Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.