दूरसंचार विभाग (डीओटी) अंतर्गत डब्ल्यूपीसी विंगचे फिल्ड युनिट असलेल्या “वायरलेस मॉनिटरींग ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) च्या निरीक्षण युनिटने ठाण्यातील भिवंडी व पिंपळा भागात बेकायदेशीर रीपीटर / बूस्टर जप्त केले.
दूरसंचार विभाग (डीओटी) अंतर्गत डब्ल्यूपीसी विंगचे फिल्ड युनिट असलेल्या “वायरलेस मॉनिटरींग ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) च्या निरीक्षण युनिटने ठाण्यातील भिवंडी व पिंपळा भागात बेकायदेशीर रीपीटर / बूस्टर जप्त केले.
डब्ल्यूपीसी विंगचे फिल्ड युनिट असलेल्या “वायरलेस मॉनिटरींग ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) च्या निरीक्षण युनिटने ठाण्यातील भिवंडी व पिंपळा भागात 18 आणि 20 फेब्रुवारी 2021 रोजी छापा टाकला. या भागामध्ये ग्राहकांना मोबाइल नेटवर्कमध्ये व्यत्यय येणे तसेच बेकायदेशीर रीपीटर / बूस्टरमुळे दूरसंचार नेटवर्क्सवर कॉल ड्रॉप होणे, डेटा सर्फिंग वेग कमी होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. यामुळे या कारवाई अंतर्गत बेकायदेशीर बूस्टर आणि रीपीटर जप्त केले.
श्री. अमित गौतम (आयईएस- भारतीय अभियांत्रिकी सेवा, आयआरआरएस ग्रुप- अधिकारी तपासणी प्रभारी महाराष्ट्र रिजन, डब्ल्यूएमओ मुंबई), श्री गजेंद्र मेवारा, श्री कैलाशनाथ, श्री आर एन लहाडके यांच्या नेतृत्वात डब्ल्यूएमओ अधिकाऱ्यांच्या टीमने 38 बूस्टर जप्त केले आहेत, 55 फीडर वायरचे जोड कापून निष्क्रिय करण्यात आले, आणि ठाण्यातील भिवंडी आणि पिंपळा भागात 14 नोटीस बजावल्या.
याव्यतिरिक्त, मोबाइल नेटवर्क बूस्टर खराब सेवा गुणवत्तेचे प्रमुख कारण बनल्यामुळे, दूरसंचार विभागाने (डीओटी) पूर्वी ई-कॉमर्स वेबसाइटना मोबाइल सिग्नल बूस्टरची यादी मागे घेण्यास सांगितले होते."
------------------------------
Comments
Post a Comment