सौ. सुलभाताई लोंढे-जोशी आणि अनंत केशव लोंढे यांचा मुंबईत सैनिकांसाठी कल्याण निधी अर्पण सोहळा

सौ. सुलभाताई लोंढे-जोशी आणि अनंत केशव लोंढे यांचा

मुंबईत सैनिकांसाठी कल्याण निधी अर्पण सोहळा 

सिचीनच्या उणे तापमानात राहून देशाचे रक्षण करणा-या जवानांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी कार्य करणारी SIRF संस्था असून त्यांच्यामार्फत सैनिकांसाठी कल्याण निधी अर्पण सोहळा मुंबईत होत आहे. पेण (रायगड) येथील प्रख्यात शिक्षिका सुलभाताई अनंत लोंढे-जोशी आणि श्री. अनंत केशव लोंढे यांच्या पुढाकाराने रामचंद्र प्रतिष्ठान या संस्थेने हा कार्यक्रम रविवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ या दिवशी सायंकाळी चार वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या शिवाजी पार्क येथील मादाम कामा सभागृहात आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात सौ. सुमेधा चितडे, सौ. सुलभाताई अनंत लोंढे-जोशी,  श्री. अनंत केशव लोंढे, रिमा सावंत, रायगडभूषण जयपाल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सुमेधा चितडे यांचेही मार्गदर्शन उपस्थितांना होईल. कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम सर्व शासकीय नियमांचे पालन करून होणार असून प्रवेश मर्यादित आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.