एको तर्फे ट्रॅफिक पोलिसांना सुरक्षा जॅकेट प्रदान

 एको तर्फे ट्रॅफिक पोलिसांना सुरक्षा जॅकेट प्रदान
 



मुंबई, २६ मार्च २०२१ : महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक पोलिस निष्ठेने करत असलेल्या कर्तव्यपालनाची दखल घेऊन आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डिजिटल माध्यमातून विमा सेवा देणा-या एको  या विमा कंपनीने यशलोक वेल्फेअर फाउंडेशन च्या सहकार्याने या विभागाच्या पोलिस कर्माचा-यांना प्रकाशपरिवर्तन करणारी सुरक्षा जॅकेट प्रदान केली.  महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक पोलिसानी देशभर चालणा-या रस्ते सुरक्षा जागृती सप्ताहाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या जागृती अभियानात एको सक्रिय सहभागी झाली होती. महामार्गांवर आणि इतर रस्त्यांवर होणारे अपघात, त्यांची कारणे आणि ते रोखण्याचे उपाय तसेच वाहतुकीविषयक नियम पाळण्याचे महत्व याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी एक खास मोहीम आयोजित करण्यात आली होती.  
 
रस्ते सुरक्षितता जागृती अभियानातील सहभागातील एक पाऊल म्हणून एको इन्शुअरन्स ने महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक पोलिस विभागाच्या ३००० पोलिस कर्माचा-यांना प्रकाश परिवर्तन करणारी सुरक्षा जॅकेट प्रदान केली. एको चा हा पुढाकार म्हणजे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती महिना उपक्रमाच्या सडक सुरक्षा, जीवन सुरक्षा या सूत्राला चालना देण्याचा प्रयत्न होता. रस्ते सुरक्षा हे सर्वांसाठी एक प्राधान्य ठरावे आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे हा संदेश जॅकेट च्या माध्यमातून अधोरेखित झाला. हायवे पोलिसांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन आणि संभाव्य धोक्यापासून त्यांचे रक्षण करणारी ही जॅकेट खास तयार करून घेण्यात आली आहेत.   
 
मुंबई येथील राज्य वाहतूक पोलिस मुख्यालयात २६ मार्च २०२१ रोजी झालेल्या एका समारंभात ही जॅकेट प्रदान करण्यात आली. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ बी के उपाध्याय, भा.पो.से., यांनी ही जॅकेट पोलिस कर्माचा-यांना प्रदान केली. मुख्यालयातील पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे भा.पो.से. आणि महामार्ग पोलिस ठाणे विभागाचे अधीक्षक दिगंबर प्रधान भा.पो.से. आणि एको जनरल इन्शुअरन्स चे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री वरुण दुआ समारंभाला उपस्थित होते. रस्ते सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत आघाडीचे शिलेदार म्हणून पोलिस कर्मचारी बजावत असलेल्या कामाची डॉ गुप्ता यांनी प्रशंसा केली.  
 
या उपक्रमात एको ने कोव्हिड आपत्तीची झळ बसून बेरोजगार झालेल्या दुर्बल वर्गासाठी कार्य करणा-या यशलोक कल्याण प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य घेतले. त्यातूनच  महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक पोलिस विभागाच्या पोलिस कर्माचा-यांना प्रकाशपरिवर्तन करणारी सुरक्षा जॅकेट शिवून देण्याचे काम करण्यासाठी ३५ व्यक्तींना रोजगार मिळाला. यासाठी संस्थेने एका अपंग महिला उद्योजिकेची मदत घेतली आणि गरीब कुटुंबांमधील २० महिला आणि कोव्हिड - १९ महामारीच्या वातावरणात रोजगार गमावलेल्या १५ तरुणींना जॅकेट शिलाईचे काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले.  
 
एको जनरल इन्शुअरन्स चे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री वरुण दुआ म्हणाले, देशभरात रस्ते आणि महामार्गांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हायवे पोलिस करत असलेल्या अविश्रांत आणि साहसी कार्यतत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना एको ला अभिमान वाटत आहे. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ बी के उपाध्याय, भा.पो.से., म्हणाले, “आम्हाला सहकार्य करून आमच्या अधिकारी - कर्माचा-यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक पोशाख उपलब्ध केल्याबद्दल आम्ही  एको ला धन्यवाद देतो.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM