रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे हेल्थ इन्फिनिटी इन्श्युरन्स पॉलिसी

 

रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे हेल्थ इन्फिनिटी इन्श्युरन्स पॉलिसी

 

रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे कोव्हिड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतला या क्षेत्रातील पहिला पुढाकार

 रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे कोव्हिड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हेल्थ इन्फिनिटी उत्पादनांवर देण्यात येणार ५% विशेष डिस्काउंट

 रिलायन्स जनरल इन्श्युरन्स - तुमच्या सुरक्षिततेचा विमा उतरविण्यापासून ते तुमच्या सुरक्षिततेची खातरजमा करेपर्यंत

 रिलायन्स जनरल इन्श्युरन्सची जबाबदार कॉर्पोरेटची कृती, कोव्हिड लसीकरणाला दिले प्रोत्साहन आणि लाभ


मुंबई, 05 मे, २०२१ : रिलायन्स कॅपिटलची १००% उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची खातरमा करण्याच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी कोव्हिड-१९ लसीकरणाचा सक्रिय प्रचार केला आहे आणि ज्यांनी लस घेतली आहे त्या ग्राहकांना लाभही देऊ केले आहेत.

 या क्षेत्रात रिलायन्स जनलर इन्श्युरन्सतर्फे प्रथमच एक पुढाकार घेण्यात आला आहे. या अंतर्गत आरजीआयची हेल्थ इन्फिनिटी इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याची किंवा रिन्यू करण्याची प्रक्रिया करणारे जे ग्राहक आहेत, त्यांच्यापैकी ज्यांनी कोव्हिड-१९ ची लस घेतली असेल त्यांना अतिरिक्त ५% वन टाइम डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोव्हिड-१९ विरुद्धच्या लढ्यात सरकारने लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढविल्यामुळे १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती कोव्हिड-१९ ची लस घेण्यास पात्र आहे

 या पुढाकारची माहिती देताना रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे सीईओ श्री. राकेश जैन म्हणाले, “प्रत्येकाने एकत्र येणे आणि सामुहिकपणे विषाणूशी लढा देण्याची आवश्यकता असताना आमच्या हेल्थ इन्फिनिटी उत्पादनासाठी कोव्हिड लस डिस्काउंट देण्यासाठी आयआरडीएआयने मंजुरी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो. वैद्यकीय तातडीसाठी प्रत्येकाने विमाधारक व्हावे यासाठी आम्ही प्रत्येकालाच प्रोत्साहित करत आहोतच, पण ही वेळ त्याहूनही अधिक काही करण्याची आहे. हा लाभ उपलब्ध करून देऊन, प्रत्येकाने या गंभीर परिस्थितीत आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि लवकरात लवकर लस घ्यावी अशी आमची इच्छा आहे.”

 रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी खरेदी करताना लागू असलेल्या इतर डिस्काउंट्सव्यतिरिक्त ५% अतिरिक्त वन टाइम डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामळे प्रीमिअम अत्यंत परवडण्याजोगा झाला आहे. विद्यमान पॉलिसीधारकांना त्यांची पॉलिसी रिन्यू करतानाही या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ज्या ग्राहकांना लसीचा पहिला डोस घेतला असेल तेही हा लाभ घेण्यास पात्र आहेत.

 हा पुढाकार म्हणजे आरजीआयच्यासमाजाला प्राधान्यया तत्वाचे द्योतक आहे आणि समाजाचे आरोग्य व कल्याण यात संस्था महत्त्वाची भूमिका निभावू शकतात हे अधोरेखित करते. भारत या महामारीशी लढा देत असताना हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

KidZania Partners with Meetakriti Art Studio to Launch Creative Pottery & Art Role-Plays for Kids