हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण, खेर यांची 'कू' वर इमोशनल पोस्ट काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर


हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण, खेर यांची 'कू' वर इमोशनल पोस्ट

काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर

आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये मुद्रा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. खेर यांनी आज कू वर पोस्ट केलेला 'काश्मिर फाइल्स' या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे


 

अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय. याआधी अग्निहोत्री यांची ' ताश्कंद फाइल्स' फिल्म चर्चेत होती.

'कू'वर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करताना खेर यांनी म्हटले आहे, 'हा सिनेमा, त्यातला माझा परफॉर्मन्स, मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला मी अर्पण करतो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही तर काश्मिरी पंडितांचं ते वास्तव आहे, जे 30 हून आधिक वर्षे लपवलं गेलं. हे सत्य आता तुमच्यासमोर येईल 26 जानेवारीला.' सिनेमात अनुपम खेर पुष्कर नाथ पंडित नावाचं पात्र साकारत आहेत. पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात. 19 जानेवारी 1990 च्या एका भयाण रात्री त्यांना काश्मिरहून आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह परागंदा व्हावे लागते. पुढे जे काही होते त्याचे चित्रण सिनेमात केले आहे. कू वर पोस्ट करताना खेर यांनी #RightToJustice आणि #Pushkar असे हॅशटॅगही दिले आहेत

"मैंने #TheKashmirFiles में अपनी performance मेरे पिता जी #Pu..."

https://www.kooapp.com/koo/anupampkher/78f062e9-e0f4-4c75-b73a-ddb63f05e679

Download Koo App

https://www.kooapp.com/dnld

विशेष म्हणजे, अनुपम खेर यांनी 'कू'वर आज 20 लाख फॉलोवर्स पूर्ण केले आहेत. खेर 'कू'वर सक्रीय असलेल्या सेलिब्रिटीजपैकी असून ते सतत खासगी जीवनासह कामाबाबतही पोस्ट करत असतात.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202