एमजी मोटरने मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म 'एमजीव्हर्स' लाँच केला

 


एमजी मोटरने मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म 'एमजीव्हर्स' लाँच केला

~ भारतातील पहिली ऑटो ओईएम बनली; सर्वोत्तम अनुभवासह ईकॉमर्स देण्याचा मनसुबा ~

मुंबई, ७ जून २०२२: एमजी मोटर आज एमजीव्हर्स या मेटाव्हर्स प्लॅटफॉर्मची त्यांच्या दृष्टीकोनाची घोषणा करणारी भारतातील पहिली ऑटो ओईएम आणि उद्योगांमधील काही मोजक्याच ब्रॅण्ड्सपैकी एक बनली. कंपनी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून ग्राहक व भागधारकांना सर्वोत्तम अनुभव देईल.

एमजीव्हर्स हे युनिव्हर्स म्हणून कार्य करेल, ज्यामध्ये एकाच व्यासपीठावर अनेक व्हर्च्युअल क्षेत्रांचा समावेश असेल. यासह ब्रॅण्डचा एमजी चाहते, ग्राहक, भागीदार व कर्मचा-यांना काम करण्यासाठी, खेळण्यासाठी, सामावून घेण्यासाठी, सहयोग करण्यासाठी, सह-निर्मिती करण्यासाठी, सामाजिक स्तरावर संवाद साधण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी एकत्र आणण्याचा मनसुबा आहे. हे युजर्सना भविष्यात स्क्रीन्सच्या मर्यादांपलीकडे आणि अंतरासंदर्भातील सीमांच्या पलीकडे जाण्यास सक्षम करेल, जेथे प्रत्येकजण नवीन शक्यतांची निर्मिती करण्यासाठी आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी एकत्र उपस्थित असू शकतात.

एमजी मोटर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, "मानवी इतिहासामध्ये इतर कोणत्याही नवोन्मेष्कारापेक्षा डिजिटल तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत झाले आहेत. एमजीव्हर्स हे एक पाऊल पुढे आहे, जेथे युजर्स वास्तविक जगाप्रमाणेच व्हिज्युअलाइज्ड डेटाशी संवाद साधू शकतात. एमजीमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना प्रत्येक टचपॉइंटवर सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. एमजीव्हर्स हा आमचा मेटाव्हर्स निर्माण करण्याप्रती दृष्टीकोन आहे, ज्यामध्ये आम्ही आणि आमचे भागीदार भविष्यात ग्राहकांचा अनुभव सातत्याने वाढवण्यासाठी सतत नवीन उपाय शोधू, त्यामध्ये नाविनन्यता आणू, सुधारणा करू आणि नवीन उपाय विकसित करू.”

ते पुढे म्हणाले, "हा उपक्रम आम्हाला जनरेशन झेड व जनरेशन अल्फासोबतचे आमचे संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल. एमजीव्हर्ससह आम्‍ही नवोन्मेष्कारी ब्रॅण्ड अनुभवांसह भावी पिढीशी ओळख करून घेण्यासाठी आमचे व्हर्च्युअल ग्राहक अनुभव कन्टेन्ट निर्माण करू."

ग्राहकांना एमजीव्हर्समध्ये त्यांच्या सर्जनशीलतेचा शोध घेण्यासाठी ब्रॅण्ड पाच विभिन्न एक्स्परिअन्स सेंटर्सची सुविधा देईल:

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs