चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीच्या प्रीमिअमवर 7.5% पर्यंत डिस्काउंट; ग्राहकांमध्ये आर्थिक सुदृढतेला चालना

चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीच्या प्रीमिअमवर 7.5% पर्यंत डिस्काउंटग्राहकांमध्ये आर्थिक सुदृढतेला चालना

मुंबई8 फेब्रुवारी 2023 : ग्राहकांनी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.ने चांगला क्रेडिट स्कोअर आणि चांगला क्रेडिट रिपोर्ट असलेल्या ग्राहकांना विम्याच्या प्रीमियमवर 7.5%* इतका डिस्काउंट देऊ केला आहे. जे कस्टमर रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी खरेदी करणार आहेत किंवा ज्यांना ही पॉलिसी रिन्यू करायची आहे त्यांना त्यांच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर हा विशेष लाभ देण्यात येत आहे.

 

चांगल्या क्रेडिट स्कोअरमधून ग्राहकांची आर्थिक शिस्त कळून येते. अशा प्रकारच्या शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चांगल्या आर्थिक सवयी अंगी बाणवण्यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने हा क्रेडिट स्कोअरवर आधारित डिस्काउंट सादर केला आहे.

 

त्याचप्रमाणे रिलायन्स हेल्थ पॉलिसी सुदृढ जीवनशैली अंगीकारणाऱ्यांना बक्षीस म्हणून त्यांच्या बॉडी मास इंडेक्सच्या (बीएमआय) आधारे प्रीमिअमवर डिस्काउंट देते. सामान्य** बीएमआय असलेले ग्राहक प्रीमियमवर डिस्काउंट मिळवू शकतात.

 

लस घेणाऱ्या व्यक्तींनाही कंपनीतर्फे विम्याच्या प्रीमियमवर 2.5* टक्के डिस्काउंट देण्यात येऊन प्रतिबंधात्मक लसीकरणाला कंपनीने प्रोत्साहन दिले होते (नवीन पॉलिसी आणि रिन्यूअल**). ज्यांनी कोव्हिड-19 ची लस किंवा बूस्टर शॉट किंवा ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस किंवा न्यूमोकोकल लस घेतली आहेत्यांना हा डिस्काउंट देण्यात आला होता.

 

रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीवर अमर्यादित लाभ मिळतात*5 कोटींपर्यंत विमा संरक्षणमोअरग्लोबल कव्हर*प्रसूती विमा संरक्षणओपीडी विमा संरक्षणविम्याच्या रकमेच्या अमर्यादित प्रमाणात पुनःस्थापना (रिस्टोरेशन) आणि पंधराहून अधिक अतिरिक्त लाभ मिळतात.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार