आयरिश सरकार परदेशात शिक्षण घेणाऱ्या इच्‍छुकांसाठी मुंबईमध्‍ये आणत आहे त्‍यांचा प्रमुख शैक्षणिक रोडशो

 

आयरिश सरकार परदेशात शिक्षण घेणाऱ्या इच्‍छुकांसाठी मुंबईमध्‍ये आणत आहे त्‍यांचा प्रमुख शैक्षणिक रोडशो

~ आयर्लंडमधील १६ उच्च शिक्षण संस्था शैक्षणिक मेळाव्‍यांसाठी पुणे आणि इतर चार शहरांना भेट देणार आहेत ~

मुंबई, फेब्रुवारी ७: भारतीय विद्यार्थ्‍यांनी दाखवलेल्‍या वाढत्‍या रूचीला प्रतिसाद देत एज्‍युकेशन इन आयर्लंड भारतातील ५ शहरांमध्‍ये त्‍यांच्‍या शैक्षणिक रोडशोसह परतले आहे. हा रोडशो मुंबईमध्‍ये सेंट रेगिस येथे १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात आला आहे, ज्‍यामध्‍ये १६ अव्‍वल आयरिश उच्‍च शैक्षणिक संस्‍था एकाच छताखाली येणार आहेत.  

आयर्लंडचे भारतातील अॅम्‍बेसेडर श्री. ब्रेंडन वॉर्ड यांनी अगदी बरोबर सांगितले की, ‘‘आयरिश युनिव्‍हर्सिटीज जागतिक स्तरावर अव्वल ५ टक्‍क्‍यांमध्ये आहेत आणि विविध विद्यार्थी संघटनांसह जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवण्याची संधी देतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्‍यांमध्‍ये ते उच्च शिक्षणासाठी पसंतीचे स्थान बनले आहे. आयर्लंडने आंतरराष्ट्रीय इच्छुकांसाठी उच्च व्हिसा मंजूरी दर देखील प्राप्त केला आहे. दोन वर्षांच्या स्टे-बॅक व्हिसाच्या पर्यायासह विद्यार्थी देशाला ऑफर कण्‍यात आलेल्‍या आर्थिक संधींचा लाभ घेऊ शकतात.’’

हा मेळावा परदेशात अभ्यास करणाऱ्या सर्व इच्छुकांसाठी खुला आहे, ज्यांना आयरिश महाविद्यालये व युनिव्‍हर्सिटीजमधील प्राध्यापक आणि प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळेल. विद्यार्थी व पालक त्यांची पात्रता, ऑफर करण्‍यात आलेले अभ्‍यासक्रम आणि पदवी अभ्‍यासक्रमासाठी शिष्यवृत्तीबद्दल मनमोकळेपणे चर्चा करू शकतात. ते आयर्लंडमधील निवास पर्यायांबद्दल मार्गदर्शनासाठी आयरिश सरकार व व्हिसा अधिकारी, तसेच ज्ञानधन (शैक्षणिक कर्जावरील सल्ल्यासाठी) आणि युनिव्हर्सिटी लिव्हिंगच्या प्रतिनिधींशी देखील संवाद साधू शकतात. अशा प्रकारे इच्छुकांना आयर्लंडमध्‍ये त्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासाची योजना करण्यास सक्षम करण्यासाठी सर्वांगीण माहिती प्राप्त होईल.

एज्‍युकेशन इन आयर्लंडसाठी भारत व दक्षिण आशियामधील प्रादेशिक व्‍यवस्‍थापक श्री. बॅरी ओड्रिस्‍कॉल म्‍हणाले, ‘‘आम्ही परदेशातील सर्व इच्छुकांना आयर्लंडची शिक्षण प्रणाली आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक संधी समजून घेण्यासाठी आमंत्रित करतो. आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसह मदत करण्यास आणि त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी उत्सुक आहोत. आयर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सातत्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आम्हाला आनंद होत आहे.’’

मुंबईव्यतिरिक्त या महिन्यात चेन्नई, बेंगळुरू, पुणे आणि दिल्ली या चार शहरांमध्ये एज्युकेशन इन आयर्लंड रोड शो आयोजित केला जाईल. ‘‘गेल्या वर्षी आयरिश शैक्षणिक मेळाव्‍यांना पाचही शहरांतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आम्ही या वेळी देखील सक्रिय सहभागाची अपेक्षा करत आहोत आणि अधिक विद्यार्थी व कुटुंबांशी संवाद साधण्यास उत्सुक आहोत,’’ असे श्री. बॅरी पुढे म्‍हणाले.

एज्‍युकेशन इन आयर्लंडची राष्‍ट्रीय मोहिम #VisaOfOpportunities लॉन्‍च झाल्‍यानंतर त्‍वरित भारतीय शहरांमध्‍ये हा रोडशो सुरू झाला. ही मोहिम देश आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थ्‍यांना ऑफर करणाऱ्या व्‍यापक शैक्षणिक व आर्थिक संधींना सादर करते.

आयर्लंडने आयटी, व्यवसाय, वित्त, बिग डेटा, वैद्यकीय तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व डिजिटल मार्केटिंग यांसारख्या विविध क्षेत्रातील शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि उत्साहवर्धक रोजगार बाजारपेठेसाठी ओळख मिळवली आहे. तसेच, त्‍यांचे यशस्वी व्हिसा क्लिअरन्स दर आणि दोन वर्षांच्या स्टे बॅक व्हिसामुळे या बेट राष्ट्राला अलिकडच्या वर्षांत परदेशात अभ्यासासाठी सर्वाधिक मागणी असलेले गंतव्यस्थान बनण्यास मदत झाली आहे.

आयर्लंडच्‍या शैक्षणिक रोडशोबाबत अधिक माहितीसाठी आणि मोफत नोंदणीसाठी कृपया त्‍यांच्‍या वेबसाइटला भेट द्या.


Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार