ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सतर्फे इष्टस्थळी पोहोचण्यासाठी ट्रॉट ही बी२बी कनेक्टेड इलेक्ट्रिक स्कूटर सादर

 ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सतर्फे इष्टस्थळी पोहोचण्यासाठी 

ट्रॉट ही बी२बी कनेक्टेड इलेक्ट्रिक स्कूटर सादर

 

  • यात आहे कमी वेगाची इलेक्ट्रिक मोटर आणि 250 किलो भारधारणक्षमता
  • बॅटरीची 3 वर्षांची वॉरंटी आणि पॉवरट्रेनची 1 वर्षाची वॉरंटी
  • रु.99,999 (एक्स-शोरूम मुंबई) या किमतीपासून उपलब्ध

 


 

मुंबई, 09 फेब्रवारी, 2023 : ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकातर्फे ओडिसी ट्रॉट या बी2बी इलेक्ट्रिक दुचाकी सादर करण्यात आली. या दुचाकीची किंमत रु.99,999 इतकी आहे. ही अत्यंत टिकाऊ भक्कम बाइक लास्ट-माइल लॉजिस्टिक्ससाठी (इष्ट स्थळी पोहोचण्याचा शेवटचा टप्पा) खास तयार केलेली असून या बाइकची लोडिंग क्षमता 250 किलो आहे. या वाहनाचे सरासरी मायलेज 75 किमी आहे आणि ही आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) कनेक्टेड असल्याने हे वाहन ट्रॅक करणेइम्मोबिलायझेशन (गाडी बंद करणे)जिओ-फेन्सिंग आणि इतर आधुनिक फीचर्स आहेत.

 

ट्रॉटमध्ये 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. या वाहनाचा कमाल वेग 25 किमी/प्रति तास इतका आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पुढील बाजूस ड्रम ब्रेक आहे आणि मागील बाजूस डिस्क-ब्रेक आहे. चार्जिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने या वाहनात 60V 32Ah क्षमतेची काढता येणारी (डिटॅचेबल) वॉटरप्रूफ बॅटरी लावलेली आहे. ही बॅटरी 2 तासांत 60% चार्ज होते आणि संपूर्ण चार्ज व्हायला 4 तास लागतात. एका चार्जमध्ये ही गाडी 75 किमी अंतर जाते. 60V32AH IP67 बॅटरी पॅकमुळे अतुलनीय टिकाऊपणा प्राप्त होतो आणि बी2बी वापरासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरते.

 

ट्रॉटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्स आहेत. डिलिव्हरी क्षेत्राच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी ते कस्टमाइझ करता येऊ शकतात. डिलिव्हरीच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ट्रॉट डिझाइन करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरअवजड हार्डवेअर उपकरणेपाण्याची पिंपे या सर्वांपासून ते किराणा सामानऔषधे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत ही उत्पादने अखंडितपणे व सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी ओडिसीतर्फे अतिरिक्त कस्टमाइझ्ड अॅक्सेसरी उपलब्ध करून देण्यात येतात.

 

इलेक्ट्रिक स्कूटर चार रंगांमध्ये उपलब्ध आहे - पिवळाकाळा, लाल आणि मरून. या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये ट्रेंडी लुक्स आणि भक्कम बांधणीची सांगड घालण्यात आली आहे. रायडरसाठी आरामदायीपणाची खातरजमा करण्यासाठी ट्रॉटमध्ये स्मार्ट बीएमएस, IoT ट्रॅकिंग डिव्हाइसएलडी ओडोमीटर इत्यादी फीचर्स समाविष्ट केले आहेत.

 

या प्रसंगी ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रा. लि.चे सीईओ श्री. नेमिन व्होरा म्हणाले, "कोव्हिड-19 महासाथीने ई-कॉमर्स आणि लास्ट माइल डिलिव्हरी (घरपोच डिलिव्हरी) या दोन क्षेत्रांच्या वाढीला चालना दिली. सातत्याने नवीन प्रयोग करणेसंचलनाचा खर्च करणे आणि कार्यक्षमता वाढविणे याला डिलिव्हरी सेगमेंटमधील व्यवसायांकडून प्राधान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे हा पर्यावरणस्नेही बदल आहे जो लोकांना व कंपन्यांना स्वीकारायचा आहे. या स्कूटरच्या निमित्ताने आम्ही बी2बी सेगमेंटमध्ये पदार्पण केले असून ही अशा प्रकारची एकमेव स्कूटर असून ती मार्केटमध्ये उलथापालथ घडवून आणणार आहे. ट्रॉटसारखी अमूलाग्र बदल घडविणारी प्रोडक्ट्स सादर करून या प्रगतीपथावर असलेल्या क्षेत्राचा पूर्ण लाभ घेण्यास आणि या सेगमेंटसाठी नवे मापदंड तयार करण्यास सज्ज आहोत."

 

या इलेक्ट्रिक स्कूटरतर्फे बॅटरीवर 3 वर्षांची आणि पॉवरट्रेनवर 1 वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. भारतभरातील ओडिसी डीलर्स आणि स्टोअर्सकडून ट्रॉट खरेदी करता येऊ शकते.

 

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार