ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केटकडून उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेसाठी शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरीचे अनावरण

ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केटकडून उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेसाठी शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरीचे अनावरण


पुणे, जून २1, २०२३: अग्रगण्य औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह पुरवठादार शॅफ्लर इंडिया लिमिटेड (BSE: 505790, NSE: SCHAEFFLER) च्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट विभागाने आज त्यांच्या नवीनतम, कल्पक आणि नावीन्यपूर्ण अशा शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरीजचे अनावरण केले. या अत्याधुनिक बॅटरी खासकरून दुचाकी अॅप्लिकेशन्ससाठी विकसित केल्या आहेत. वाहन चालवण्यास त्रास होऊ नये यासाठी उत्कृष्ट व्हीआरएलए (VRLA-व्हॉल्व्ह रेग्युलेटेड लीड अॅसिड) तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर केला आहे.

        शॅफ्लर इंडिया लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट विभागाचे अध्यक्ष श्री. देबाशिष सत्पाठी म्हणाले, “आम्ही शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरीज सादर करण्यास उत्सुक आहोत, जी दुचाकी वाहनांसाठी बॅटरी तंत्रज्ञानातील महत्वपूर्ण प्रगती दर्शवते. देखभालमुक्त व्हावे यासाठी व्हीआरएलए (VRLA) बॅटरी डिझाईन केल्या आहेत. कल्पकता आणि ग्राहकांचे समाधान यावर आमचे लक्ष्य केंद्रित करून या बॅटरी झटपट सुरू करण्याची क्षमता उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि कमी देखभाल, विना त्रास चालवण्याचा अनुभव याची खात्री देतात.”

       शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरी रेंजमध्ये अनेक नावीन्यपूर्ण वैशिष्ठ्ये आहेत, ज्यामुळे ती उत्कृष्ट कामगिरी आणि शाश्वतता शोधणाऱ्या चालकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनते. 

मुख्य वैशिष्ठ्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

1.     मजबूत आणि कमी संक्षारक मिश्रधातू:

      मजबूत आणि कमी संक्षारक मिश्रधातूंपासून तयार केलेल्या या बॅटरी दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि सहनशील असून कठीण परिस्थितीला उत्तम पद्धतीने तोंड देण्याच्या दृष्टीने त्या तयार केल्या आहेत.

2.     उच्च कार्यक्षमतेसाठी विशेष सक्रिय साहित्य:

       या बॅटरीमध्ये एक विशेष सक्रिय सामग्री समाविष्ट केली जाते , जी अपवादा‍त्मक कार्यप्रदर्शन देते आणि चालकांना त्यांचा प्रवास आत्मविश्वासाने करता यावा यासाठी विश्वसनीय शक्ती प्रदान करते.

3.     स्पिल प्रूफ आणि कंपन प्रतिरोधक कार्यासाठी एजीएम विभाजक:

     प्रगत अशा एजीएम विभाजकाने सुसज्ज असलेली बॅटरी स्पिल प्रूफ आणि कंपन प्रतिरोधक कार्य करतात हे चालकासाठी खडबडीत भूप्रदेशांवर सुद्धा मनःशान्ती सुनिश्चित करते.

4.     कमी सेल्फ-डिस्चार्ज दरासाठी उच्च शुद्धता लीड आणि इलेक्ट्रोलाइट:

      शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरी उच्च शुद्धता लीड (९९.९९%) आणि इलेक्ट्रोलाइट बॅटरी वापरतात, परिणामी सेल्फ डिस्चार्ज दर कमी होतो. याचा अर्थ असा की, अधिक काळ स्टोरेज होऊन गेल्यानंतरसुद्धा चालक त्यांच्या बॅटरीवर विश्वास ठेऊ शकतात.

5.     वाहनातील एकपेक्षा जास्त अॅंगल्सच्या फिटमेंटसाठी लवचिक फिटमेंट:

     या बॅटरी मध्ये लवचिक अशी फिटमेंट डिझाईन आहे ज्यामुळे वेगवेगळ्या दुचाकींमध्ये एकपेक्षा जास्त अॅंगल्सचे फिटमेंट करता येते. ही अनुकूलता वाहनांच्या मोठ्या श्रेणींसह सहज व अखंड एकीकरण सुनिश्चित करते.

उद्योग क्षेत्रातील आघाडीची २४+२४ महिन्यांची वॉरंटी आणि प्रगत वैशिष्ठ्यांसह शॅफ्लरने शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरी हे दुचाकी वाहनांसाठी एक विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकणारे समाधान दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार