सीएन्ट डीएलएम लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार, २७ जून २०२३ पासून खुली होणार


सीएन्ट डीएलएम लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ)

मंगळवार, २७ जून २०२३ पासून खुली होणार

• सीएन्ट डीएलएम लिमिटेडच्या (“इक्विटी शेअर्स”) १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअर साठी २५० रुपये ते २६५ रुपये इतका किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. 

• मुख्य गुंतवणूकदार बोली/ इश्यू कालावधी- सोमवार, २६ जून २०२३  

• बीड/ इश्यू खुला होण्याचा दिनांक- मंगळवार, २७ जून २०२३ आणि बीड/ इश्यू बंद  होण्याचा दिनांक- शुक्रवार, ३० जून २०२३  

• बोली किमान ५६ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ५६ च्या पटीत लावता येणार आहे.



राष्ट्रीय, २२ जून २०२३: सीएंट डीएलएम लिमिटेड ("कंपनी") ने ५,९२०.०० दशलक्ष रुपये ("इश्यू") पर्यंत इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार २७ जून २०२३ पासून खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बिड/इश्यूचा शेवटचा दिनांक शुक्रवार, ३० जून २०२३ असेल. मुख्य गुंतवणूकदार बोली /इश्यू कालावधी हा बिड/इश्यू खुला होण्याच्या तारखेच्या कामकाजाचा एक दिवस आधी म्हणजेच सोमवार, २६ जून २०२३ आहे. 

इश्यूसाठी किंमतपट्टा प्रत्येक इक्विटी शेअर साठी २५० रुपये ते २६५ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान ५६ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५६ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

कंपनीने BRLMS शी सल्लामसलत करून १,०८०.०० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या ४,०७५,४७१ इक्विटी शेअर्सची खाजगी प्लेसमेंट हाती घेतली आहे. 

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम ३१  सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(२) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी नेट ऑफरच्या किमान ७५% समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी ("प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत")  राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. जर प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रस्तावित पेक्षा कमी समभागांना मागणी आली किंवा प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिश्शामध्ये वाटप झाले नाही तर असे सर्व शिल्लक समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (“QIBs”) हिश्शामध्ये वर्ग करण्यात येतील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी ५ % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ऑफर प्राईस इतक्या किंवा QIB भागाच्या ५% हून कमी किमतीला बोली मिळाल्यास QIB मध्ये सुयोग्य वाटपासाठी म्युच्युअल फंड भागात वाटणीसाठी उपलब्ध झालेले राहिलेले इक्विटी समभाग उर्वरित QIB भागात वर्ग होतील. म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध शिल्लक इक्विटी समभाग QIBS ला उर्वरित वाटपासाठी उर्वरित QIB भागामध्ये जोडले जातील.

तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या (अ) १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा प्रमाणित तत्वावर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (त्यापैकी एक तृतीयांश भाग २००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १,०००,०००  रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग १,०००,०००  रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल.) आणि सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार योजनेच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ऑफर किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यासच हे हिस्सा वाटप केले जाईल. 

पुढे, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणार्‍या पात्र कर्मचार्‍यांना इक्विटी समभागांचे वाटप प्रमाणानुसार केले जाईल. अर्थात त्यासाठी त्यांच्याकडून इश्यू किमतीवर किंवा त्याहून अधिक वैध बिड्स प्राप्त झाल्यास हे लागू होईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) रिटेल गुंतवणूकदरांसह सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या एससीएसबीतर्फे  ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. 

१९ जून २०२३ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस ("रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस") द्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड ("BSE") आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("NSE", BSE आणि NSE दोन्ही मिळून “स्टॉक एक्सचेंज”)वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. 

अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड आणि जेएम फायनान्शीयल लिमिटेड हे इश्यूचे ("BRLMS") बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.




Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार