मकरंद, तेजस्विनीचा ‘छापा काटा’ आता ओटीटीवर!

 

मकरंद, तेजस्विनीचा ‘छापा काटा’ आता ओटीटीवर!



मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जोरदार धमाका उडवला होता. आता हा चित्रपट घरबसल्या अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर पहाण्यासाठी उपलब्ध झाला आहे. मकरंदचा सिनेमा म्हणजे 100% मनोरंजनाची खात्री, ज्यांची चित्रपटगृहात ही संधी हुकली होती, त्यांच्यासाठी पुन्हा घरबसल्या ही मजा घेता येणार आहे.


चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर, सुनिधि चौहान आणि आदर्श शिंदे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातील गीतांने प्रेम, भावना आणि उत्साहाचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. चित्रपटातील या सुमधुर गीतांना सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर आणि गौरव चाटी यांनी आपल्या संगीत कौशल्याने संगीतबद्ध असून गाण्यांना रसिक प्रेक्षकांचा संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.


लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM