आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात अजय पुरकर साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका...*
' आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात अजय पुरकर साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका... मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' हा चित्रपट येत्या १४ जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ''आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पूरकर अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहे. अण्णासाहेब पाटील हे मराठ्यांचे पहिले नेते होते. त्यासोबतच माथाडी कामगारांचे प्रश्न आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. अवघ्या मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यामुळेच मराठा समाजाचे पहिले नेते म्हणून अण्णासाहेब पाटील यांच नाव घेतलं जातं. त्यांच्यासारखं भारदस्त व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारण्याची संधी या चित्रपटाद्वारे अभिनेता अजय पुरकरांना ...