फ्युचर जनरालीच्या डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन इन्श्युरन्सचा वापर करून तुमच्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्नतोट्यापासून करा संरक्षण
फ्युचर जनरालीच्या डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन इन्श्युरन्सचा वापर करून तुमच्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्नतोट्यापासून करा संरक्षण फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्सने (एफजीआयआय) डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन इन्श्युरन्स ही योजना सुरू केली आहे. ही अशा प्रकारची पहिलीच योजना असून पॉलिसीधारकाला व्यंग आले असता ही पॉलिसी त्याला आर्थिक कवच प्रदान करते. कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचे नुकसान होऊ न देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक संरक्षण प्रदान करण्यास नियोक्त्यांना म्हणजे एम्प्लॉयर्सना मदत करणे हा या पॉलिसीचा प्राथमिक हेतू आहे. हे कर्मचारी त्यांचे राहणीमान कायम ठेवू शकतील आणि आवश्यक खर्च भागवू शकतील, याची यामुळे खातरजमा होईल. एफजीआयआयचा डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन इन्श्युरन्स प्लॅन हे ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स प्रोडक्ट असून यात तात्पुरत्या व कायमस्वरुपी व्यंगापासून संरक्षण प्राप्त होते. यात शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या आजारांचा म्हणजे विमा कालावधीत निदान झालेले आजार, अपघातामुळे झालेल्या शारीरिक इजा, आणि अनपेक्षित व अपवादात्मक प्रसंगांमुळे निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांचा समावेश आहे, ज्यामुळे...