मुलांमध्ये श्वसनाच्या व्यवस्थापनासाठी 'नेब्युलायझर'चा वापर करा- 'ओम्रॉन हेल्थकेअर'चे आवाहन
मुलांमध्ये श्वसनाच्या व्यवस्थापनासाठी 'नेब्युलायझर'चा वापर करा- 'ओम्रॉन हेल्थकेअर'चे आवाहन मुंबई, ३० ऑगस्ट २०२४ : महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये श्वसनाचे विविध आजार सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. दमा, श्वासनलिकादाह (ब्राँकायटिस) आणि फुप्फुसदाह (न्यूमोनिया) यांसारख्या समस्यांचा केवळ या मुलांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या आरोग्य सुविधांवरही मोठा ताण पडतो. श्वासोच्छवासाच्या समस्येवर व्यवस्थापन करण्यासाठी 'नेब्युलायझर' हे एक महत्त्वाचे साधन म्हणून उदयास आले असून, त्याचा वापर करण्याचे आवाहन ओम्रॉन हेल्थकेअर'ने केले आहे. जागतिक पातळीवर तीव्र श्वसन संक्रमणाने (एआरआय) (प्रामुख्याने न्यूमोनिया) ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २० टक्के मुलांचा मृत्यू होतो. जर न्यूमोनियाचाही विचार केला तर, पाच वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण ३५-४० टक्क्यांपर्यंत वाढते, ज्यामध्ये दरवर्षी २.०४ दशलक्ष मृत्यू होतात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३च्या शेवटच्या दोन महिन्यांत महाराष्ट्रातील १७ विभागांत तीव्र श्वसन संक्रमणाची १ हजार ९०० ...