सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर सादर करत आहे, झीरो फेस्टिव्हल 2024
सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर सादर करत आहे, झीरो फेस्टिव्हल 2024
सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर
आणि भारताच्या सर्वाधिक हरित संगीत महोत्सवाच्या भागीदारीच्या प्रदीर्घ परंपरेत यंदा
तामिक्रेस्ट, बल्लीमारन, हनुमानकाइंड, डॅबझी आणि इतर काही कलाकार या महोत्सवात
सहभागी होणार
निसर्ग बऱ्याचदा अगदी आगळ्यावेगळ्या पण सुंदर रूपात अभिव्यक्त होत असतो. निसर्गाच्या
सान्निध्यात आणि त्याचे गुणगान करत, त्याचे जतन करत जगलेले आयुष्य सार्थकता देते. आपण
हे जाणतो की, चांगल्या पद्धतीने जगणे आणि चांगले कर्म करणे यांचे जवळचे नाते आहे
आणि या दोन्हीमुळे आपले जीवन आणि आपल्या आसपासचे विश्व समृद्ध होत असते.
सिग्नेचर पॅकेज्ड
ड्रिंकिंग वॉटर आपल्या चाहत्यांना गोष्टी नैसर्गिक रूपात जतन करण्याची, चांगले
आयुष्य जगण्याची आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची- (#onewithnature) प्रेरणा देते. त्यामुळेच, झीरो फेस्टिव्हलशी असलेली त्यांची प्रदीर्घ
भागीदारी चालू ठेवली यह. झीरो फेस्टिव्हल हा भारतातील एक अत्यंत मोठा आणि
निसर्गाचे साहचर्य असलेला भव्य सोहळा आहे. अरुणाचल प्रदेशातील झीरो व्हॅलीच्या
हिरव्यागार प्रदेशात साजरा होणारा हा 4-दिवसीय महोत्सव जीवनाच्या पर्यायी मार्गाशी
लीन होण्यास मदत करतो.
या महोत्सवात विविध प्रकारच्या आणि समृद्ध अनुभवांची एक मालिका आपल्या समोर येते. हे अनुभव
निसर्गप्रेमींना तसेच संगीत रसिकांना आकर्षित करतात. इको-सजग प्रथांपासून ते महोत्सवात
सादर होणाऱ्या सांस्कृतिक आणि सांगीतिक कृतींपर्यंत सर्वांसाठी हा महोत्सव एक
अनोखा मंच सादर करतो. आणि येथे उपस्थित रसिकांना विविध परफॉर्मन्सचा आस्वाद घेता घेता, वेगवेगळे क्रियाकलाप
करता-करता निसर्गाचे
विलोभनीय रूपही अनुभवता येते. हा महोत्सव यंदा 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान
आयोजित करण्यात आला आहे.
सिग्नेचर पॅकेज्ड
ड्रिंकिंग वॉटर आणि झीरो फेस्टिव्हल यांच्या भागीदारीच्या मुळाशी हे जग अधिक सुंदर बनवण्याचा ध्यास आहे. प्रेरणादायक
मास्टरक्लास, शेतापासून ते मेजापर्यंतच्या पाककृती, प्लॉगिंग वगैरेंच्या
माध्यमातून एका सजग जीवनशैलीची गुंफण करत हा महोत्सव एक खास शिबिर स्थळ सादर करतो
आणि येथील प्राचीन भूमीचा मान राखत कोणतेही निशाण मागे राहू देत नाही. या
महोत्सवात बांबू आणि स्थानिक अपातानी कारागिरी देखील सादर करण्यात येते. येथे
बायोडिग्रेडेबल तामुल प्लेट्सचा उपयोग केला जातो आणि सिंगल-यूज प्लॅस्टिकचा वापर
टाळला जातो. साईनेजिससाठी पुन्हा प्राप्त केलेले लाकूड वापरण्यात येते आणि पाणी
विनामूल्य उपलब्ध करून बाटल्यांचा पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
यंदाच्या झीरो फेस्टिव्हलमध्ये एकापेक्षा एक मोठे गायक, वादक धमाल उडवून देणार आहेत. त्यांच्यात सामील
आहेत- तामिक्रेस्टचे टुआरेग बीट्स, हृदयाला हात घालणारा कैलाश खेर, दोन प्रकारांचे
मिश्रण करणारा हनुमानकाइंड, केरळचा हिप-हॉप स्टार डॅबझी सिंगापूरचा पोस्ट-रॉक
बॅन्ड अमॅच्युअर टेक्स कंट्रोल, अरुणाचलचा डोबॉम डोजी कॅरोलीना नोर्बू, नेपाळी
चार्ट-टॉपर सुशांत के. सी. स्वीडनचा साईक-रॉक ग्रुप हॉलो शिप, वीणा वादक डॉ. जयंती
रमेश, इ. या विविध, प्रज्ञावान गायक-वादकांनी सादर केलेल्या संगीताचे सूर व्हॅलीत
दुमदुमत राहतील आणि इतर संगीत महोत्सवांपेक्षा झीरो फेस्टिव्हलचे वेगळेपण उठून
दिसेल तसेच प्रेक्षकांना नवीन संगीत आणि कलाकार यांचा शोध घेण्याची संधी मिळेल.
वरुण कूरिच, उपाध्यक्ष आणि पोर्टफोलिओ प्रमुख, मार्केटिंग, डियाजिओ
इंडिया म्हणाले, “प्रेझेंटिंग पार्टनर
म्हणून झीरो फेस्टिव्हलशी असलेले नाते कायम ठेवत असताना आम्ही हे जाणतो आहोत की,
नव्या काळातील उपभोक्ते अधिक सक्रिय, हुशार आणि जाणीवपूर्वक निवड करणारे व
अर्थपूर्ण अनुभव शोधणारे आहेत. आजकालच्या प्रेक्षकांचा कल अर्थपूर्ण जीवन
जगण्याकडे असल्याचे स्पष्ट दिसते. गेल्या वर्षीच्या यशामुळे सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे ‘लिव्ह गुड, डू गुड’ तत्त्व आणि झीरो म्युझिक फेस्टिव्हलचा
भारतातील एक अत्यंत इको-फ्रेंडली महोत्सव म्हणून असलेला नावलौकिक यांच्यातील
दृढतेला बळकटी मिळाली आहे. यंदा आमचे लक्ष त्या यशाचा फायदा करून घेऊन ते आणखी
उंचावर नण्याचा आहे. अरुणाचलच्या निसर्गरम्य प्रदेशात योजण्यात आलेल्या या
महोत्सवात अनेक कलाकारांच्या कलाकृती सादर होतील, रसिकांना कलेचा वेधक अनुभव घेता येईल,
फार्म-टू-टेबल पाककृती आस्वादता येतील आणि इको-सजग उपक्रम देखील राबवण्यात येतील. निसर्गप्रेमींना
एकत्र आणण्याचे, संगीत आणि इको-सजग जीवनशैली जेथे एकरूप होऊन एक वेधक आणि आकर्षक
अनुभव निर्माण करते आणि निसर्गाशी अर्थपूर्ण नाते निर्माण करते अशा ठिकाणी सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरला आघाडीवर
स्थापित करण्याचे आमच्या भागीदारीचे लक्ष्य आहे.”
झीरो फेस्टिव्हलचे सह-संस्थापक आणि फेस्टिव्हल
डायरेक्टर बॉबी हानो म्हणाले, “सुरुवातीपासूनच शाश्वतता झीरो
फेस्टिव्हलच्या मुळाशी आहे. संगीत आणि संस्कृतीचा गौरव करताना पर्यावरणाचे रक्षण
करण्याची आमची वचनबद्धता कायम ठेवण्यात सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरशी आम्ही केलेली भागीदारी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आम्ही
एकत्र मिळून हे दाखवून देऊ इच्छितो की, आम्ही सादर करतो, तसे समारंभ पर्यावरण-सजग
प्रथा आणि प्रभावी, संस्मरणीय अनुभव यांच्यातील समतोल कसा उत्तम सांभाळू शकतात.”
सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निसर्गप्रेमी रसिकांना पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि अधिक तेजस्वी आणि सुसंवादी भविष्यासाठी अर्थपूर्ण जीवनाची कला आत्मसात करताना झीरो फेस्टिव्हलच्या निमित्ताने निसर्गाच्या अस्सल अनुभवात रमण्यासाठी आमंत्रित करत आहे.

Comments
Post a Comment