फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सने ‘इट्स अ वंडरफुल वर्ल्ड’ या विशेष कॉफी टेबल बुकद्वारे डीईआय टप्पा केला साजरा

फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सने ‘इट्स अ वंडरफुल वर्ल्ड’ या विशेष कॉफी टेबल बुकद्वारे डीईआय टप्पा केला साजरा


~ अधिकृत घोषणा!: एफजीआयआयच्या कार्यबलातील 1% कर्मचारी दिव्यांग ~ 

~ राणा दग्गुबाती, श्रीकांत बोल्ला, अवनी लेखरा, सुधा चंद्रन यांच्या उपस्थितीत एफजीआयआयने या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त विशेष एडिशन पुस्तक प्रकाशित केले ~


फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीने आपल्या डीईआय प्रवासात महत्त्वाचा टप्पा गाठत ‘इट्स अ वंडरफुल वर्ल्ड’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले आहे. सर्वसमावेशकता, जिद्द आणि परिवर्तनाच्या प्रेरणादायी कथा मांडणारे हे पुस्तक भव्य सोहळ्यात सादर करण्यात आले. विविधता, समानता आणि समावेशन या बद्दल एफजीआयआयच्या दृढ बांधिलकीचे हे प्रतीक आहे. प्रत्येकाचे म्हणणे ऐकले जाते, तेव्हा खऱ्या अर्थाने जग सुंदर होते, हेच या पुस्तकाच्या माध्यमातून अधोरेखित होते. समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती तसेच एफजीआयआयच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. एफजीआयआयमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 1% असण्याचा टप्पा गाठण्याचा एफजीआयआयचा हा महत्त्वपूर्ण क्षण साजरा करण्यात आला आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रतिष्ठित सेलिब्रिटी पाहुण्यांची उपस्थिती लाभली. प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबाती, सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भरतनाट्यम नृत्यांगना सुधा चंद्रन, दोन वेळची पॅरालिंपिक विजेती अवनी लेखरा आणि बोल्लंट इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत बोल्ला या सोहळ्यात सहभागी झाले होते.

2022 मध्ये एफजीआयआयने डीईआयला धोरणात्मक प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. धोरणांमध्ये बदल करण्यापासून ते जनजागृती आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी विशेष सत्र आयोजित करण्यापर्यंत, तसेच एलजीबीटीक्यूआयए+ समुदाय आणि महिलांसाठी खऱ्या अर्थाने समावेशक उत्पादने सादर करण्यापर्यंत, एफजीआयआयने एक सर्वसमावेशक नियोक्ता, विमादाता आणि जबाबदार कॉर्पोरेट संस्था होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

आपल्या मनुष्यबळातील किमान 1% कर्मचारी दिव्यांग असतील याची खात्री करणे, हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट एफजीआयआयने ठरवले होते. दृढ निश्चयाच्या जोरावर कंपनीने हे लक्ष्य साध्य केले असून, केवळ एका वर्षात 16 प्रादेशिक शाखांमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 41 पर्यंत वाढवली आहे. या शिवाय, कंपनीत भरती झालेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 22% महिला असून, सर्वार्थाने समावेशक कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या एफजीआयआयच्या प्रयत्नांना हे आणखी बळकटी देणारे ठरले आहे.

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप राऊ म्हणाले, “समावेशन ही केवळ धोरणाची बाब नसून, ती प्रत्यक्षात अनुभवता यायला हवी. खऱ्या अर्थाने समावेशकता म्हणजे प्रत्येक भागधारकाला निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे, जेणेकरून आपण करत असलेल्या उपाययोजना विविध समुदायांच्या गरजा भागविण्यासाठी उपयुक्त ठरतील. आमच्या मनुष्यबळातील 1% कर्मचारी दिव्यांग आहेत, ही बाब आमच्यासाठी जबाबदारी नव्हे, तर प्रतिभा, दृष्टीकोन आणि क्षमतेप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शवते. सर्वसमावेशक नियोक्ता अधिक सर्वसमावेशक - आणि मी म्हणेन, अधिक चांगला विमादाता ठरतो, कारण त्याच्याकडे अधिक सहानुभूती, संवेदनशीलता आणि करुणा असते.”

ब्रेल आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध असलेले लिमिटेड एडिशन कलेक्टिबल ‘इट्स अ वंडरफुल वर्ल्ड’ हे सर्वसमावेशकतेच्या भावनेला समर्पित असलेले एक विचारपूर्वक संकलित केलेले पुस्तक आहे. एफजीआयआयच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचा असामान्य प्रवासाचा गौरव या पुस्तकाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. यात राणा दग्गुबाती, सुधा चंद्रन, अरुणिमा सिन्हा, अवनी लेखरा, श्रीकांत बोल्ला, कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी आणि मिनाती बारिक यांच्यासारख्या आपल्या क्षेत्रात नवा पायंडा पाडणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा आहेत. मिनाती बारिक या एका दिव्यांग व्यक्ती असून, त्यांनी ओडिशातील आपल्या गावातून धैर्याने पंचायत निवडणूक लढवली.  दिव्यांग हक्कांसाठी कार्य करणाऱ्या फेय डिसोझा, विराली मोदी, निपुण मल्होत्रा, टिफनी ब्रार यांसारख्या समर्थकांचे विचारही या पुस्तकात ठळकपणे मांडले आहेत. ‘इट्स अ वंडरफुल वर्ल्ड’ हे केवळ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 याविषयी माहिती देत नाही, तर अर्थपूर्ण डीईआय प्रवास सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी दिशादर्शक ठरते.

या कार्यक्रमाच्या निमत्ताने सर्वसमावेशक मनुष्यबळ सज्ज करण्याच्या एफजीआयआयची दृढ बांधिलकी अधोरेखित झाली आणि संपूर्ण उद्योगासाठी एक नवा आदर्श निर्माण केला. ‘लीडिंग वुइथ अ ह्यमुन टच’ला (‘माणुसकीला केंद्रस्थानी ठेवून नेतृत्व करणे’) प्राधान्य देण्याच्या आपल्या दृष्टीकोनावर कंपनी ठाम असून, भविष्यातही सकारात्मक बदल घडवणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देत राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE