अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर एव्हरलाइट बाय सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे अंधेरी मेट्रो स्थानकात नवे स्टोअर सुरू


अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर एव्हरलाइट बाय सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे अंधेरी मेट्रो स्थानकात नवे स्टोअर सुरू 

~ सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे भारतातील १७७ वे स्टोअर ~



मुंबई, २९ एप्रिल २०२५: दागिन्यांच्या बाजारपेठेत एक नवा मापदंड स्थापित करत सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सने आपले नवे एव्हरलाइट बाय सेन्को स्टोअर मुंबईतील वर्दळीच्या अंधेरी मेट्रो स्थानकात सुरू केले आहे. या प्रकारचे हे पहिलेच स्टोअर आहे. सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सने अत्यंत अभिमानाने आपल्या या १७७ व्या स्टोअरच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. २०० चौ. फुटात वसलेले हे स्टोअर म्हणजे ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण दागिने आणि अतुलनीय कलाकुसर शहरात सर्वत्र उपलब्ध करून देण्याच्या ब्रँडच्या बांधिलकीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे.


अंधेरी मेट्रो स्थानकातील स्टोअरच्या या भव्य उद्घाटन सोहळ्यातील ग्लॅमर आणि उत्साह वृद्धिंगत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर उपस्थित असणार आहेत. एव्हरलाइट बाय सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या या नव्या स्टोअरमध्ये आमच्या एव्हरलाइट ब्रँडचे व्यापक कलेक्शन उपलब्ध असणार आहे. आधुनिक हलक्या वजनाचे डिझाइन असलेले हे समाकालीन डिझाइन्स दैनंदिन वापरासाठी सुयोग्य आहेत. त्यामुळे, हे स्टोअर सर्व प्रसंगांसाठीच्या खरेदीचे उत्तम ठिकाण ठरेल.


या उद्घाटनाबद्दल सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या संचालक जोइता सेन म्हणाल्या, "मुंबईचे आमच्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि सेन्कोचा अनुभव मुंबईच्या मेट्रो नेटवर्कच्या केंद्रस्थानी आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या नवीन स्टोअरमध्ये व्यस्त प्रवाशांना आणि शहरी ग्राहकांना कारागिरी किंवा शैलीशी तडजोड न करता समकालीन, हलके आणि बहुपयोगी दागिने सहज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या वृद्धिंगत होणाऱ्या वारशाच्या उत्सवात भर घालण्यासाठी मानुषी छिल्लर या प्रसंगी उपस्थित असतील, याचा आम्हाला आनंद आहे."


सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे मुख्य महाव्यवस्थापक धवल राजा म्हणाले, “अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने भारतात आमची उपस्थिती वाढवत असताना एव्हरलाइट बाय सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचा हलक्या वजनाच्या दागिन्यांचा संग्रह नवीन स्टोअरमध्ये सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या स्टोअरसह भारतभरातील आमच्या स्टोअर्सची संख्या १७७ वर पोहोचली आहे. मेट्रो स्टेशनवरील या पहिल्याच ज्वेलरी आउटलेटसह, सेन्को आमच्या ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात उत्कृष्ट कलाकुसर आणि आधुनिक डिझाइन उपलब्ध करून देण्याचा नवा स्रोत देत आहे. दागिन्यांच्या चाहत्यांचे स्वागत करण्यास आणि त्यांना प्रीमियम शॉपिंग अनुभव प्रदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”


या उद्घाटन सोहळ्याबद्दल उत्साह व्यक्त करताना अभिनेत्री मानुषी छिल्लर म्हणाल्या, "सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईमध्ये सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या नवीन स्टोअर लाँचचा भाग असल्याचा मला आनंद होत आहे. शहराची मुळे स्टेशनशी संबंधित असतात आणि अशा वर्दळीच्या जागी स्टोअर सुरू केल्याने कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हे एक सुयोग्य ठिकाण ठरेल. सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स नेहमीच सुंदरता आणि परंपरांसाठी ओळखले जाते. स्टाइल आणि सत्त्वाला महत्त्व देणाऱ्या आधुनिक भारतीय महिलांच्या भावना एव्हरलाइटच्या हलक्या आणि समकालीन डिझाइनमधून प्रतिबिंबित होतात. या अप्रतिम कलेक्शनच्या अनावरणासाठी मी उत्सुक आहे. हे कलेक्शन मुंबईकरांना नक्कीच आवडेल."


सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सने आठ दशकांहून अधिक काळापासून दागिने उद्योगात एक विश्वासार्ह नाव म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि परंपरेचा मिलाफ असणारे सुंदर डिझाइनचे दागिने सादर करत हा ब्रँड संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवत आहे.


या भव्य उद्घाटन सोहळ्यात आकर्षक ऑफर्स, विशेष सवलती आणि नवीन डिझाइन्सचे विशेष प्रदर्शन होते. त्यामुळे मोठ्या संख्येने दागिने प्रेमी आणि ग्राहकांनी इथे हजेरी लावली.

Comments

Popular posts from this blog

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Composer and singer duo Clinton Cerejo-Bianca Gomes, aka Shor Police, join forces with Yami Gautam & Pratik Gandhi for ‘Dhoom Dhaam’