मोटोरोलाकडून भारतात एज ६० प्रो लाँच,
मोटोरोलाकडून भारतात एज ६० प्रो लाँच
मोटोरोला या मोबाइल तंत्रज्ञान व इनोव्हेशनमधील जागतिक अग्रणी आणि भारतातील आघाडीच्या एआय स्मार्टफोन ब्रँडने आज मोटोरोला एज ६० प्रो च्या लाँचसह त्यांच्या एज ६० लाइनअपमध्ये आणखी एका सर्वोत्तम स्मार्टफोनची भर केली. या डिवाईसमध्ये सेगमेंटमधील एकमेव ५० एमपी + ५० एमपी + ५०एक्स (टेलिफोटो) अॅडवान्स्ड एआय कॅमेरा, सेगमेंटमधील सर्वात वैयक्तिकृत व संदर्भीय ऑन-डिवाईस एआय अनुभवासह समर्पित एआय की आणि जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्वॉड-कॅमेरा कर्व्ह डिस्प्ले आहे. तसेच, मोटोरोला एज ६० प्रो मध्ये डीएक्सओएमएआरकेचे गोल्ड सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर जगातील सर्वोच्च बॅटरी रेटिंग - ६००० एमएएच बॅटरीसह ९० वॅट टर्बोपॉवर चार्जिंग आणि १५ वॅट वायरलेस चार्जिंग आहे. या डिवाईसमध्ये अविश्वसनीयरित्या शक्तिशाली व एआय सक्षम मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० एक्स्ट्रीम प्रोसेसरची शक्ती आहे.
एआय बाबत माहिती:
सेगमेंटमधील सर्वात वैयक्तिकृत व संदर्भीय एआय सादर करत मोटोरोला एज ६० प्रो मध्ये मोटो एआयची शक्ती आहे. हे पार्श्वभूमीवर कार्यरत राहत वापरकर्त्यांशी परस्परसंवाद व संलग्न होण्यासाठी स्मार्टर, अधिक सर्वोत्तम मार्ग देते.
तसेच नेक्स्ट मूव्ह वैशिष्ट्य वापरकर्त्यांच्या स्क्रिनवर असलेले कन्टेन्ट, जसे रेसिपी किंवा ग्रुप चॅट ओळखते आणि रिअल टाइममध्ये उपयुक्त पुढील स्टेप्स देते. नेक्स्ट मूव्ह वैशिष्ट्य एआय अनुभव घेण्यास नवीन आणि एक्स्प्लोअर करण्याची इच्छा असलेल्यांसाठी उपयुक्त आहे. हीच बाब पुढील वैशिष्ट्यांच्या बाबतीत आहे:
○ प्लेलिस्ट स्टुडिओ स्क्रिनवर आधारित परिपूर्ण प्लेलिस्ट तयार करते, ज्यामुळे योग्य वाइब निर्माण होते.
○ इमेज स्टुडिओ संकल्पनांना इमेजेस्, अवतार, स्टिकर्स व वॉलपेपर्समध्ये बदलण्यासाठी जनरेशन एआय क्रिएशन व एडिटिंग क्षमतांचा वापर करते.
या वर्षाच्या सुरूवातीला घोषणा करण्यात आलेले स्मार्ट कनेक्ट विथ एआय साधे वॉईस किंवा टेक्स्ट कमांड जसे 'शो मी धीस ऑन माय टीव्ही'ला स्ट्रिमिंग अॅपच्या माध्यमातून मोठ्या डिस्प्लेवर दाखवते, ज्यामुळे फोनमधील कन्टेन्ट पीसी किंवा टॅब्लेटवर पाहता येऊ शकतात किंवा मल्टीटास्किंगसाठी हब व्ह्यू कार्यान्वित करता येऊ शकतो.
दैनंदिन टास्क्स सोपे करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले मोटो एआय परिपूर्ण फोटो कॅप्चर करण्यापासून नोटिफिकेशन्स संघटित करण्यापर्यंत सर्वकाही स्मार्टर व अधिक वैयक्तिक करते. क्रिएट, कॅप्चर व असिस्ट या तीन मुलभूत आधारस्तंभ अंतर्गत मोटो एआय वापरकर्त्यांना अर्थपूर्ण पद्धतीने सक्षम करते. क्रिएटमध्ये एआय इमेज स्टुडिओ व एआय प्लेलिस्ट स्टुडिओ सारखी वैशिष्ट्ये सर्जनशीलता आणि वैयक्तिक अभिव्यक्तीच्या नवीन स्तराला अनलॉक करतात. कॅप्चर कॅमेरा सिस्टममध्ये शक्तिशाली एआयची भर करत फोटोमध्ये आकर्षकतेची भर करते. असिस्ट वैशिष्ट्ये, जसे पे अटेंशन - जे पार्श्वभूमीमध्ये ऑडिओला ऐकते, ट्रान्सक्राइब व सारांश करते, रिमेंबर धीस, रिकॉल व जर्नल वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवण्यास, संघटित करण्यास व पुन्हा अवलोकन करण्यास मदत करतात आणि कॅचमी अपसह त्यांना चुकलेल्या अपडेट्सचे सारांश मिळते.
मोटोरोला एज ६० प्रो च्या लाँचसह मोटोरोला मोटो एआयच्या माध्यमातून, तसेच परप्लेक्सिटी, मायक्रोसॉफ्ट व गुगल यांच्यासोबत सहयोग करण्याद्वारे शक्तिशाली एआयला एकीकृत करत स्मार्टफोन अनुभवाला नव्या उंचीवर नेत आहे. वापरकर्ते स्मार्टर, अधिक स्थिर सपोर्टसाठी त्यांच्या पसंतीचे एआय असिस्टण्ट निवडू शकतात. मोटोरोला स्मार्टफोन्समध्ये परप्लेक्सिटीएआय आणणारी पहिली कंपनी बनली आहे, जे तीन महिन्यांसाठी मोफत परप्लेक्सिटी प्रो देते. मायक्रोसॉफ्ट कॉपीलॉट आता रिअल-टाइम असिस्टण्ससाठी मोटो एआयच्या माध्यमातून एम्बेड करण्यात आले आहे, तर गुगल जेमिनी स्मार्ट ट्रिप नियोजन, लाइव्ह संवाद आणि तीन महिन्यांच्या जेमिनी अॅडवान्स्डसह २ टीबी क्लाऊड स्टोरेजची भर करते. हायब्रिड एआय आर्किटेक्चरची शक्ती असलेला एज ६० प्रो मेटाच्या लामा व गुगलच्या इमॅजने ३ व जेमिनी २ मॉडेल्सचा उपयोग करत डिवाईसवर व क्लाऊडवर जलद, सुरक्षित व अधिक वैयक्तिकृत अनुभव देतो.
Comments
Post a Comment