मोटोरोलाकडून जगातील पहिला फ्लिप फोन रेझर ६० लाँच
मोटोरोलाकडून जगातील पहिला फ्लिप फोन रेझर ६० लाँच
मोटोरोलाकडून जगातील पहिला फ्लिप फोन रेझर ६० लाँच, ज्यामध्ये आहे गेस्चर कंट्रोल्ड व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि १०० परसेंट ट्रू कलर कॅमेरा, पर्ल मार्बल अँड फॅब्रिक फिनिश, ५००के+ फ्लिप्ससाठी चाचणी करण्यात आलेले टायटॅनियम-रिइन्फोर्स हिंज आणि एक्स्टर्नल डिस्प्लेवर सेगमेंटमधील ओन्ली फिल्पसह मोटोएआय व जेमिनी असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन, किंमत फक्त रूपीज ४९,९९९
- मोटोरोला रेझर ६० मध्ये रेकॉर्डिंगदरम्यान व्हिडिओ जेस्चर्ससह जगातील पहिले फ्लिप, तसेच पॅन्टोनद्वारे प्रमाणित १०० टक्के टू कलर कॅमेरा आहे, जो प्रत्येक फोटोमध्ये वास्तविक रंगसंगती आणि स्किन टोन अचूकता देतो. व्हिडिओ गेस्चर्स कन्टेन्ट क्रिएटर्सना हँड्सफ्री रेकॉर्डिंगला सुरूवात करण्याची/ थांबवण्याची/ पॉज करण्याची सुविधा देतात.
- ओआयएससह मोटो एआयद्वारे समर्थित ५० एमपी प्रो-गेड कॅमेरा, १३ एमपी अल्ट्रावाइड + मॅक्रो व्हिजन लेन्स आणि ३२ एमपी सेल्फी कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन हँड्स-फ्री कंट्रोल, अधिक सुस्पष्टता आणि सर्व प्रकाश स्थितींमध्ये अत्यंत सुलभ व्हिडिओ रेकॉर्डिंगसह ऑटो व्हिडिओ एन्हान्समेंट देतो.
- मोटोरोला रेझर ६० मध्ये भारतातील पहिले पर्ल मार्बल व फॅब्रिक फिनिशेस् आहेत, जे लक्झरीअस अनुभव व सुधारित ग्रिप देण्यासाठी प्रीमियम घटकांसह डिझाइन करण्यात आले आहेत आणि स्टायलिश व टिकाऊ फ्लिप फोन्ससाठी नवीन मानक स्थापित करत आहेत. हा स्मार्टफोन प्रीमियम वेगन लेदर फिनिशमध्ये देखील उपलब्ध आहे.
- मोटोरोला रेझर ६० मध्ये ५००,०००+ फोल्ड्ससाठी प्रमाणित सर्वात टिकाऊ टायटॅनियम-रिइन्फोर्स हिंज, आयपी४८-प्रमाणित पाणी व धूळीपासून संरक्षण आणि अद्वितीय टिकाऊपणा व विनासायास युजर अनुभवासाठी क्रीजलेस ६.९-इंच एलटीपीओ पीओएलईडी डिस्प्ले आहे.
- मोटोरोला रेझर ६० मध्ये सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ३.६ इंच एक्स्टर्नल डिस्प्लेसह फ्लूईड ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, गोरिला® ग्लास व्हिक्टसचे संरक्षण यासोबत सुधारित मल्टीटास्किंग व कन्टेन्ट निर्मितीसाठी कॅमकोर्डर, डेस्क, लॅपटॉप व टेण्ट यांसारखे वैविध्यपूर्ण फ्लेक्स मोड्स देखील आहेत.
- मोटोरोला रेझर ६० एक्स्टर्नल डिस्प्लेवर मोटोएआय व गुगल जेमिनी असलेला सेगमेंटमधील एकमेव फ्लिप फोन देखील आहे, जो स्मार्ट सारांश, लाइव्ह ट्रान्सक्रिप्शन, वैयक्तिक साह्य आणि विनासायास गुगल फोटोज एकीकरण उपलब्ध करून देण्यासाठी एआयचे साधे जेस्चर कार्यान्वित करतो, ज्यासाठी फोन ओपन करण्याची गरज भासत नाही.
- मोटोरोला रेझर ६० इंटेलिजण्ट मोटोएआय २.० सह स्मार्ट राहणीमानाला नव्या उंचीवर घेऊन जातो, ज्यामध्ये सक्रिय साह्यतेसाठी नेक्स्ट मूव्ह सजेशन्स, एआय-पॉवर्ड क्रिएटिव्हीटी टूल्स, त्वरित मेमरी रिकॉल आणि विनासायास मल्टीटास्किंग वैशिष्ट्ये आहेत, जी तुम्हाला अग्रणी ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.
- भारतभरात फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, Motorola.in वर आणि आघाडीच्या रिटेल स्टोअर्समध्ये ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएण्टसाठी फक्त रूपीज ४९,९९९ च्या प्रभावी किमतीसह मोटोरोला रेझर ६० ची विक्री सुरू होईल.
२८ मे २०२५: मोटोरोला या मोबाइल फोन इनोव्हेशनमधील जागतिक अग्रणी आणि भारतातील आघाडीच्या एआय स्मार्टफोन ब्रँडने आज नवीन मोटोरोला रेझर ६० लाँच केला. हा ब्रँडच्या प्रीमियम रेझर लाइनअपमधील नवीन स्मार्टफोन आहे, जो फ्लिप फोन श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जातो. स्टाइलमध्ये अग्रस्थानी असलेल्या जेनरेशन झेड क्रिएटर्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या रेझर ६० मध्ये जगातील पहिले गेस्चर-आधारित व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पॅन्टोनद्वारे प्रमाणित १०० परसेंट ट्रू कलर कॅमेरा आहे, जो अद्वितीय कलर अचूकता आणि वास्तविक व्हिज्युअल्स देतो. हा लक्झरीअस पर्ल मार्बल व फॅब्रिक फिनिशेस् देणारा भारतातील पहिला फ्लिप फोन देखील आहे, जो प्रीमियम घटकांच्या माध्यमातून डिझाइनला अधिक आकर्षक करतो. टिकाऊपणासाठी निर्माण करण्यात आलेल्या या डिवाईसमध्ये ५००,००० हून अधिक फोल्ड्ससाठी चाचणी करण्यात आलेले टायटॅनियम-रिइन्फोर्स हिंज आहे, ज्याला पूरक आयपी४८ पाणी व धूळीपासून संरक्षण आणि कॉर्निंग® गोरिला® ग्लास व्हिक्टस संरक्षण आहे. रेझर ६० सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ३.६ इंच पीओएलईडी एक्स्टर्नल डिस्प्लेसह अग्रस्थानी आहे, जो ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि डेस्क व टेण्टपासून लॅपटॉप व कॅमकार्डरपर्यंत विविध फ्लेक्स मोड्स देतो. तसेच, हा बाहेरील डिस्प्लेवर मोटोएआय व गुगल जेमिनी असलेला सेगमेंटमधील एकमेव फ्लिप फोन आहे, ज्यामधून विनासायास सर्वोत्तम अनुभवासाठी स्मार्ट, संदर्भीय साह्य आणि सक्रिय 'नेक्स्ट मूव्ह' प्रॉम्ट्स मिळतात.
मोटोरोला रेझर ६० फ्लिप फोनवरील जगातील पहिल्या जेस्चर्स आधारित व्हिडिओ रेकॉर्डिंगसह मोबाइल व्हिडिओग्राफीला नव्या उंचीवर घेऊन जातो, ज्यासोबत वास्तविक व्हिज्युअल्ससाठी पॅन्टोन™ द्वारे प्रमाणित १०० परसेंट ट्रू कलर कॅमेरा आहे. सर्वोत्तम एअर गेस्चर कंट्रोल्ससह वापरकर्ते स्क्रिनला स्पर्श न करता कन्टेन्ट कॅप्चर करू शकतात, काऊंटडाऊन सुरू करण्यासाठी हाताचा तळ कॅमेऱ्यासमोर धरा, पॉज करण्यासाठी हाताची मूठ बंद करा आणि रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी हाताची मूठ दाखवा. हे सर्वोत्तम, हँड्स-फ्री ऑपरेशन कन्टेन्ट निर्मितीला विनासायास अनुभवामध्ये बदलते, जे चालता फिरता व्हीलॉगिंग किंवा सर्वोत्तम क्षणांना कॅप्चर करण्यासाठी परिपूर्ण आहे.
Comments
Post a Comment