'क्लूक'चे भारती सिंगबरोबर 'द बेस्ट यू' डिजिटल कॅम्पेन
'क्लूक'चे भारती सिंगबरोबर 'द बेस्ट यू' डिजिटल कॅम्पेन
मुंबई, आशिया खंडात काय काय नवीन्यपूर्ण आहे, याची जगाला माहिती करून देण्यासाठी पर्यटन आणि तत्सम अनुभूती देणारे प्रसिद्ध व्यासपीठ 'क्लूक'ने भारतात 'तुमच्यासाठी सर्वोत्तम' अर्थात 'द बेस्ट यू' ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. ही कथाकथनावर आधारित मोहीम आहे, जी प्रवासाच्या भावनिक आणि अनुभवात्मक शक्तीवर प्रकाश टाकते. या मोहिमेच्या केंद्रस्थानी भारतातील प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंग आहे, जी हसविण्यासाठी नाही तर पुनर्शोधासाठी हा प्रवास सुरू करते. . ही मोहीम एका नव्याने लाँच झालेल्या 'ब्रँड फिल्म'द्वारे दर्शविण्यात आली असून, (Bharti Singh's Best Self in Dubai! ✨ - YouTube) जी भारतीचे भावनिक परिवर्तन प्रवासाच्या अविश्वसनीय क्षणांमध्ये कैद करते. क्लूकची भारतातील 'द बेस्ट यू' मोहीम, ज्यामध्ये भारती सिंगचा समावेश आहे, एक साधी परंतु तितकीच प्रभावी कल्पना पुढे आणते, ती म्हणजे प्रवास हा फक्त तुम्ही कुठे जाता याबद्दल नाही, तर तो वाटेत तुम्ही कोण बनता, याबद्दल आहे.
भारती सिंग आणि प्रवास कथाकथनासाठी एक नवीन अध्याय: बुद्धिचातुर्य, स्पष्टवक्तेपणा/मनमोकळेपणा आणि लवचिकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारती सिंगला वर्षानुवर्षे शारीरिक टीका-टिप्पणी आणि समाजीय अपेक्षा, अशा सार्वजनिक समीक्षणाचा सामना करावा लागला आहे. ही मोहीम तिच्या कथेला हृदयस्पर्शी, अपरिचित आणि खोलवर वैयक्तिक अनुभवांमध्ये ठेवून पुन्हा मांडते. प्रत्येक क्षण तिला थांबण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि स्वतःशी पुन्हा जोडण्यासाठी आमंत्रित करतो.
'या क्षेत्रात मला माझी ओळख मिळविण्यासाठी, माझे अस्तित्व टिकविण्यासाठी किती मोठा संघर्ष, प्रवास करावा लागला हे फार कमी लोकांना माहिती आहे,' असे भारती सिंग म्हणाली. 'गेल्या काही वर्षांत, मी माझे जीवन कसे जगावे याबद्दल असंख्य मते ऐकली आहेत. पण आता, मला थांबायचे आहे, श्वास घ्यायचा आहे आणि फक्त माझ्यासाठी काहीतरी करायचे आहे. पुन्हा जोडण्यासाठी, अज्ञातांना अंगीकारण्यासाठी आणि माझ्या हृदयाला खरोखर स्पर्श करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यासाठी, प्रवास मला ती जागा देते.
'द बेस्ट यू' ही केवळ एक मोहीम नाही; प्रवासाला वैयक्तिक, आनंददायी आणि भावनिकदृष्ट्या सहस्पंदित बनविण्याची 'क्लूक'ची वचनबद्धता आहे,' असे क्लूक इंडिया आणि पश्चिम आशियाचे (मिडल ईस्ट) विपणन प्रमुख (मार्केटिंग लीड) शिवम त्यागी म्हणाले. 'आजच्या काळात प्रेक्षकांना असा प्रवास हवा असतो जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि आयुष्यात त्यांच्या स्थानाचे प्रतिबिंब दाखवतो. प्रवास म्हणजे फक्त आपण एखाद्या ठिकाणाला भेट देणे नव्हे, तर अशा ठिकाणांना भेट दिल्यानंतर तेथून आपण ज्या भावना, अनुभव जोडीला घेऊन जातो, तो म्हणजे प्रवास; हास्य विनोद, नवनवीन खाद्यपदार्थ, पर्यटनस्थळी भेटणाऱ्या व्यक्ती आणि वाटेत आपण निर्माण केलेल्या कथा, म्हणजेच प्रवास. त्यात भारतीचा प्रवास हा याची साक्ष देतो की, जेव्हा आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढतो तेव्हा काय काय शक्य आहे.'
संपूर्ण संयुक्त अरब अमीरातमध्ये (यूएई) चित्रित केलेला भारतीचा प्रवास हा टीमलॅब फेनोमेना अबू धाबीच्या अतिवास्तव, संवेदी जगात पाऊल ठेवण्यापासून ते कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या तल्लीन कला क्षेत्रात हरवून जाण्यापर्यंत किंवा दररोजच्या गोष्टींना उजाळा देणाऱ्या वाळवंट सफारीच्या शांतता आणि थराराचा स्वीकार करण्यापर्यंत, असा तल्लीन आणि चिंतनशील क्षणांनी भरलेला आहे. ही मोहीम एकूणच प्रवास आणि भारती या दोघांचीही एक वेगळी बाजू समोर आणते, जी आपल्याला आठवण करून देते की कधीकधी कोणत्याही गोष्टीत आनंद निवडणे हा सर्वांत अर्थपूर्ण प्रवास असतो.
नवीन युगातील प्रवाशांसाठी डिझाइन केलेली मोहीम
आजचे प्रवासी, विशेषतः १९८० ते १९९०च्या मध्ये जन्मलेले (जनरेशन वाय) आणि जनरेशन 'झेड' आता केवळ चांगल्या पर्यटनस्थळांची निवड करीत नाहीत. तर 'क्लूक'च्या नवीन 'ट्रॅव्हल पल्स' अभ्यासानुसार, या गटातील तीनपैकी दोन भारतीय प्रवाशांचा समूह म्हणतो, की ते केवळ पर्यटनस्थळांना भेटण्याऐवजी वैयक्तिक परिवर्तनालाही प्राधान्य देतात. ही मोहीम प्रवाशांना वास्तविक कथा, अविस्मरणीय क्षण आणि त्यांच्यासाठी बनवलेले अनुभव या माध्यमाद्वारे भेटून त्या बदलाचा फायदा मिळवून देते. ही तरुणाई केवळ चित्र-परिपूर्ण प्रवास शोधत नाहीत, तर आनंद, स्पष्टता आणि आश्चर्य निर्माण करणारे वास्तविक अनुभवही शोधत आहेत.

Comments
Post a Comment