ग्लोबोकॅन च्या माहितीनुसार भारतातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस साठी अपोलोचा ‘चेक-ओलेट’ अनोखा उपक्रम
ग्लोबोकॅन च्या माहितीनुसार भारतातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस साठी अपोलोचा ‘चेक-ओलेट’ अनोखा उपक्रम मुंबई, ३० ऑक्टोबर २०२५ : ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस महिन्यात, अपोलो कॅन्सर सेंटर्स ने ‘चेक-ओलेट’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे एक गोड पदार्थ जो स्वतःची काळजी घेण्याची गोड आठवण देतो.ग्लोबोकॅन च्या माहितीनुसार, भारतातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, सर्व नवीन कर्करोग प्रकरणांपैकी १३.५% आणि कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी १०.६% प्रकरणे याच कर्करोगाची आहेत. या वाढत्या प्रमाणानुसारही फक्त १.६% (NCBI) महिला, वय ३०–६९ वर्षे, यांनी कधीही स्क्रीनिंग केलेले आहे. या चिंताजनक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर, अपोलो कॅन्सर सेंटर्सचा उद्देश ‘चेक-ओलेट’च्या माध्यमातून स्वयं-देखभालीला सामान्य करण्याचा आणि महिलांना दरमहा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावून त्यांना त्यांच्या आरोग्यावर लवकर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आहे.‘चेक-ओलेट’ हा फक्त ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस महिन्यातील उपक्रम नाही तर महिलांना त्यांच्या आरो...