महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने 

७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले राष्ट्र ध्वजवंदन



दादासाहेब फाळके चित्रनगरी २६ : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या प्रांगणात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांचा हस्ते राष्ट्र ध्वजवंदन करण्यात आले. दरम्यान भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

यावेळी श्रीमती म्हसे पाटील यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांना प्रजासत्ताक  दिनाच्या  शुभेच्छा दिल्या. २०२७ हे वर्ष महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने विविध उपक्रम हाती घेण्याचे संकल्प करण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.  यासाठी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि एकजूट महत्वाचे असल्याचे स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितले. महामंडळाच्या प्रशासकीय इमारती जवळ चित्रांगण सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहात अत्याधुनिक प्रोजेक्टर सह ध्वनीयंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन श्रीमती स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार