पुण्यात कोंढवा येथे Oasis Fertility चे नवीन सेंटर – शहरात प्रगत फर्टिलिटी उपचार आता अधिक जवळ
पुण्यात कोंढवा येथे Oasis Fertility चे नवीन सेंटर – शहरात प्रगत फर्टिलिटी उपचार आता अधिक जवळ
पुणे, जानेवारी 2026: Oasis Fertility या भारतातील विश्वासार्ह फर्टिलिटी केअर नेटवर्कने पुण्यातील कोंढवा येथे आपले नवीन फर्टिलिटी सेंटर सुरू केले आहे. 16 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या Oasis Fertility मुळे आता पुणेकरांना प्रगत फर्टिलिटी उपचार अधिक जवळ आणि सहज उपलब्ध होणार आहेत. वारंवार गर्भपात, IVF अपयश, इम्प्लांटेशन फेल्युअर यांसारख्या अवघड केसेसमध्येही Oasis Fertility ने हजारो दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून दिला आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे आणि उशिरा लग्न-पालकत्वाच्या निर्णयांमुळे शहरांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या वाढताना दिसत आहेत. पुण्यासारख्या मोठ्या शहरात लांब अंतर, वेळेची अडचण आणि प्रवासाचा त्रास यामुळे अनेकदा तपासणी आणि उपचार उशिरा होतात. हे लक्षात घेऊन कोंढवा येथे नवीन सेंटर सुरू करण्यात आले असून, यामुळे दाम्पत्यांना वेळेवर सल्ला, तपासण्या आणि योग्य उपचार घेणे अधिक सोपे होणार आहे.
कोंढवा येथील हे नवीन सेंटर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून येथे IVF, IUI, फर्टिलिटी प्रिझर्वेशन, पुरुष वंध्यत्व उपचार तसेच PGT, IVM सारखे प्रगत उपचार उपलब्ध आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले, तपासण्या आणि आधुनिक लॅब सुविधा येथे एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
डॉ. दुर्गा जी राव, मेडिकल डायरेक्टर व को-फाउंडर, Oasis Fertility म्हणाले: “गेल्या 16 वर्षांपासून Oasis Fertility वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिक उपचार पद्धती आणि वैयक्तिक उपचार योजनांवर काम करत आहे. शहरांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या होत आहेत. त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळणे खूप गरजेचे आहे.”
पुष्कराज शेनॉय, CEO, Oasis Fertility म्हणाले: आज फर्टिलिटी समस्या बदलत आहेत आणि वेळेवर उपचार मिळणे खूप महत्त्वाचे झाले आहे. पुण्यात आमची उपस्थिती वाढवत आम्ही दाम्पत्यांच्या अधिक जवळ पोहोचत आहोत.”
डॉ. निलेश उमेश बालकवडे, Regional Medical Head व फर्टिलिटी तज्ज्ञ, Oasis Fertility म्हणाले: “कोंढवा येथील नवीन सेंटरमुळे रुग्णांना त्यांच्या घराजवळ प्रगत उपचार मिळतील. यामुळे वेळेवर निदान आणि सातत्यपूर्ण उपचार शक्य होतील.”
Oasis Fertility गेल्या 16 वर्षांपासून दाम्पत्यांच्या पालकत्वाच्या प्रवासात विश्वासाने सोबत उभी आहे. कोंढवा येथील नवीन सेंटर ही त्याच प्रवासातील एक महत्त्वाची पायरी आहे.

Comments
Post a Comment