महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजारमध्ये मराठी चित्रपटांना सहभागी होण्याचे आवाहन

 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजारमध्ये मराठी चित्रपटांना सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत ७९ व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजार २०२६ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ०१.०१.२०२५ ते ३१.१२.२०२५ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ गेले अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांना ‘कान्स फिल्म बाजार’ मध्ये सहभागी होण्यासाठी पाठवते. यंदा या महोत्सवाचे ७९ वे वर्षे आहे. त्यानुसार, यावर्षी देखील मंडळामार्फत  ०१.०१.२०२५ ते ३१.१२.२०२५ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. तरी, निर्माते / निर्मिती संस्थांनी निवड प्रक्रियेसाठी विहित नमुन्यातील अर्ज cfffm2026@gmail.com या ई-मेल वर दि.२१.०२.२०२६ ते ०७.०३.२०२६ या कालावधीत सादर करायचे आहेत. याबाबत आवश्यक माहिती www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महोत्सवात सहभागी होण्याची अन्य नियमावली...

१. चित्रपटाची लांबी कमीत कमी ९० मिनिटे असावी (फिचर फिल्म)

२. इतर भाषेतील रिमेक, डब असलेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येणार नाही.

३.ज्या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजार २०२५ करिता महामंडळामार्फत निवड करण्यात आली होती अशा चित्रपटांना सहभाग घेता येणार नाही.

४. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. ९८१९६३८२२१ (श्री. मंगेश राऊळ) आणि ९७०२२७०८२१ (श्री. पंकज चव्हाण) ९८९०३८१५१८ (श्री. भास्कर साळवी), ९८९०६६८९१६ (श्री. विष्णु गायकवाड) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 


Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM