जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई ऐरोलीत माइंडस्पेस इकोरन 2.0 म्यारेथॉनचे आयोजन

 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई ऐरोलीत माइंडस्पेस इकोरन 2.0 म्यारेथॉनचे आयोजन

फिटनेस आणि शाश्वततेचा संदेश देत 4000 हून अधिक 

महिला-पुरुष धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग


नवी मुंबई, 9 मार्च 2026: नवी मुंबईत रविवारी सकाळी उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेची लाट अनुभवायला मिळाली, कारण माइंडस्पेस ऐरोली ईस्ट, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या माइंडस्पेस इकोरन 2.0 मध्ये 4000 हून अधिक महिला-पुरुष धावपटूंनी सहभाग घेतला. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयोजन माइंडस्पेस REIT यांनी मिर्चीच्या सहकार्याने केले होते. शहरात  धावण्याची प्रेरणा आणि शाश्वततेचा ठाम संदेश या दोन्हींचे सुंदर मिश्रण या कार्यक्रमात पाहायला मिळाले. अनुभवी धावपटू, प्रथमच धावणारे, कुटुंबे तसेच कॉर्पोरेट टीम्स अशा विविध स्तरांतील महिलानी यात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी मिर्चीच्या RJ प्रेरणा ने या रनचे सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते आणि त्यांनी धावण्याच्या स्पर्धेला फ्लॅग-ऑफ केले. “Ginny Wedss Sunny 2” या चित्रपटातील कलाकार अविनाश तिवारी आणि मेधा शंकर उपस्थित होते. अभिनेत्री डेजी शाह सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाली आणि फिटनेस व शाश्वततेच्या या उत्सवाचा भाग बनली.

धावपटूंनी 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी या श्रेणींमध्ये सहभाग घेतला. 21 किमी हाफ मॅरेथॉन आणि 10 किमी या श्रेणींमध्ये 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या सहभागींचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला, तर 5 किमी रनमध्ये 8 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना सहभागाची संधी देण्यात आली. त्यामुळे हा कार्यक्रम सर्व वयोगटांसाठी फिटनेस आणि सामुदायिक भावनेचा समावेशक उत्सव ठरला आणि मुंबईतील कार्यस्थळे व स्थानिक परिसरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला.

या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. 21 किमी हाफ मॅरेथॉनसाठी ₹20,000, ₹14,000 आणि ₹10,000 अशी पारितोषिके देण्यात आली, तर 10 किमी श्रेणीसाठी ₹14,000, ₹12,000 आणि ₹8,000 अशी पारितोषिके देण्यात आली.

पर्यावरणपूरक अनुभव देण्याच्या उद्देशाने माइंडस्पेस इकोरन 2.0 मध्ये अनेक इको-फ्रेंडली उपक्रम राबवण्यात आले. यात प्लांटेबल बिब्स, ऑर्गॅनिक जर्सी, रीफिलेबल हायड्रेशन स्टेशन्स आणि नाश्त्यासाठी बायोडिग्रेडेबल कटलरी यांचा समावेश होता. या उपक्रमांचा उद्देश कार्यक्रमादरम्यान सिंगल-यूज वस्तूंचा वापर कमी करणे आणि जबाबदार कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा होता.


Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार