युनियन बँक ऑफ इंडियाचे आर्थिक निकाल जाहीर

युनियन बँक ऑफ इंडियाचे आर्थिक निकाल जाहीर

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १८,६९७ कोटी रुपयांचा नफा

युनियन बँक ऑफ इंडिया च्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही व आर्थिक वर्ष २०२६ चे आर्थिक निकाल जाहीर केले. बँकेने मजबूत व्यवसाय वाढ, कमी झालेले एनपीए आणि भक्कम भांडवली गुणोत्तर यामुळे सकारात्मक कामगिरी नोंदवली आहे.

बँकेने प्रति इक्विटी शेअर ५ रुपये (फेस व्हॅल्यू १० रुपयांच्या ५० टक्के) लाभांश देण्याची शिफारस केली आहे. यासाठी आवश्यक मंजुरी मिळणे बाकी आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये बँकेचा निव्वळ नफा १८,६९७ कोटी रुपये झाला. व्याज उत्पन्न १,०५,९९२ कोटी रुपये इतके नोंदवले गेले.

बँकेचा एकूण व्यवसाय ५.७८ टक्क्यांनी वाढून २३,८५,५०२ कोटी रुपयांवर पोहोचला असून ग्रॉस अॅडव्हान्सेसमध्ये ९.७४ टक्के वाढ झाली तर ठेवींमध्ये २.७२ टक्के वाढ झाली. ३१ मार्च २०२६ पर्यंत बँकेच्या एकूण ठेवी १३,०६,८९१ कोटी रुपये झाल्या आहेत.

बँकेच्या आरएएम सेगमेंटमध्ये १२.५६ टक्के, रिटेल अॅडव्हान्सेसमध्ये १६.७५ टक्के तर एमएसएमई अॅडव्हान्सेसमध्ये १८.७५ टक्के वाढ झाली आहे. डोमेस्टिक अॅडव्हान्सेसमध्ये आरएएमचा वाटा ५७.४९ टक्के झाला आहे. ग्रॉस एनपीए २.८२ टक्क्यांवर आला (७८ बेसिस पॉइंट्स घट) तर  नेट एनपीए ०.४८ टक्क्यांवर (१५ बेसिस पॉइंट्स घट) आहे. बँकेचे देश-विदेशात एकूण ८,६९७ शाखा आणि ८,६५६ एटीएम कार्यरत आहेत. तसेच २६,१४७ बीसी पॉइंट्सद्वारे सेवा दिली जात आहे.

सरकारी योजनांमध्ये बँकेची सक्रिय भूमिका दिसून आली, त्यानुसार पीएमजेजेबीवाय : ३.०९ लाख नवीन नोंदणी, पीएमएसबीवाय : १०.२५ लाख नवीन नोंदणी, पीएमजेडीवाय : ३.४० कोटी खाती, १५,९६४ कोटी शिल्लक तर अटल पेन्शन योजना : २.२७ लाख नवीन नोंदणी झाली आहे. नारी शक्ती योजनेअंतर्गत ५६० कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे तर नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी ३३,५७२ कोटी मंजूर केले आहे. ग्रीन व्हेईकल कर्ज २,०८४ कोटी मंजूर झाले आहे. एकूणच, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये बँकेने स्थिर आणि संतुलित वाढ नोंदवत आर्थिक स्थिती अधिक मजबूत केली असल्याचे बँकेने सांगितले.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार