बॅग्मेन प्राइम ऑफिस REIT चा ₹३,४०५ कोटींचा IPO ५ मे २०२६ पासून खुला होणार
बॅग्मेन प्राइम ऑफिस REIT चा ₹३,४०५ कोटींचा
आयपीओ ५ मे २०२६ पासून खुला होणार
बंगळुरू-आधारित प्रीमियम कमर्शिअल ऑफिस REIT, बॅग्मेन प्राइम ऑफिस REIT ने आपल्या ₹३,४०५ कोटींच्या Initial Public Offering (IPO) साठी किंमत बँड निश्चित केला आहे. यातील युनिटची किंमत ₹९५ ते ₹१०० दरम्यान ठेवण्यात आली आहे. बिड/ऑफर ओपनिंग डेट: मंगळवार, ५ मे २०२६ असून बिड/ऑफर क्लोजिंग डेट: गुरुवार, ७ मे २०२६ अशी आहे. अँकर इन्व्हेस्टर बिडिंग: सोमवार, ४ मे २०२६ (एक दिवस आधी) असेल.
ऑफरची रचना अशाप्रकारे आहे : फ्रेश इश्यू: ₹२,३९० कोटी (नवीन युनिट्स जारी करून), ऑफर फॉर सेल (OFS): ₹१,०१५ कोटी (ब्लॅकस्टोनशी संबंधित BREP Asia III India Holding Co VIII Pte. Ltd. द्वारे).
प्राथमिक इश्यूमधील पैशाचा वापर Luxor at Bagmane Capital Tech Park (१० लाख चौरस फूट) आणि Bagmane Rio Business Park मधील ९३% हिस्सा खरेदी करण्यासाठी केला जाईल. दोन्ही प्रीमियम ग्रेड A+ ऑफिस एसेट्स आहेत. सामान्य गुंतवणूकदारांसाठी किमान १५० युनिट्स आणि त्यानंतर १५० युनिट्सच्या गुणाकारात अर्ज करता येईल. कंपनीने आधीच ₹८५० कोटी (८.५ कोटी युनिट्स) साठी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरांकडून कमिटमेंट्स मिळवल्या आहेत. यामध्ये UTI म्युच्युअल फंड, Jhunjhunwala फॅमिली ट्रस्ट्स, Axis Max Life, ICICI Pension, Kotak Life Insurance, Star Health इत्यादी संस्थांचा समावेश आहे.
बॅग्मेन प्राइम ऑफिस REIT बंगळुरूमधील ग्रेड A+ बिझनेस पार्क्सचे पोर्टफोलिओ व्यवस्थापित करते. याचे स्पॉन्सर Bagmane Realty and Infrastructure LLP (Bagmane Group) आहे. Axis Trustee Services Limited ट्रस्टी आणि Bagmane Realty Investment Manager Private Limited मॅनेजर म्हणून काम करेल. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेनुसार SEBI च्या REIT Regulations २०१४ आणि Master Circular नुसार राबवली जाईल.

Comments
Post a Comment