टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

 टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित

 ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे.

  • यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे.



टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने आज टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते. असे गिरीश हड़कर, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशियासेल्सफोर्स आणि मनकिरन चौहान एमडी यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

या डिजिटल परिवर्तनामुळे व्यवसायातही चांगले परिणाम दिसून आले असून, कन्व्हर्जन रेटमध्ये 10% वाढ झाली आहे, लीड क्वालिफिकेशनमध्ये 30% सुधारणा झाली आहे आणि ईमेल उघडण्याचे प्रमाण (ओपन रेट) 50 ते 60% पर्यंत वाढले आहेत. यामुळे एआय एजंट्स आणि एकत्रित डेटा यांच्या मदतीने रिअल इस्टेट क्षेत्रातील ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला होत असल्याचे दिसून येते.

टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) ने एजंटफोर्स मार्केटिंग, एजंटफोर्स सेल्स आणि एजंटफोर्स सर्व्हिस हे प्लॅटफॉर्म डेटा 360 सोबत एकत्र करून वापरले आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाचा पहिल्या चौकशीपासून ते खरेदीनंतरच्या सेवांपर्यंतचा संपूर्ण प्रवास एकाच ठिकाणी आणि रिअल-टाइममध्ये पाहता येतो. या एकत्रित सिस्टीममुळे एआय एजंट्स आणि मानवी टीम एकत्र काम करू शकतात आणि ग्राहकांना अधिक जलद, वैयक्तिक आणि 24x7 सेवा देऊ शकतात. हा प्लॅटफॉर्म व्हॉट्सप, एसएमएस आणि ईमेलद्वारे सतत ग्राहकांची माहिती तपासून योग्य लीड्स तयार करण्यात मदत करतो. तसेच सेल्स टीमला योग्य वेळी सूचना आणि शिफारसी मिळतात, ज्यामुळे ग्राहकांशी संवाद अधिक चांगला होतो. ग्राहकांचे कठीण प्रश्न थेट संबंधित तज्ज्ञांकडे पाठवले जातात. याशिवाय, लाईव्ह डॅशबोर्डमुळे लीडरशिप टीमला ग्राहकांशी सुरू असलेल्या संवादाची रिअल-टाइम माहिती सतत मिळत राहते.

टीआरआयएलची “ग्राहक प्रथम” ही विचारसरणी नेहमीच त्यांच्या यशाचा महत्त्वाचा भाग राहिली आहे. आजचे घर खरेदीदार डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करत असल्यामुळे त्यांना त्वरित प्रतिसाद आणि सर्व माध्यमांवर एकसारखा अनुभव अपेक्षित असतो. हे लक्षात घेऊन कंपनीने ग्राहक सेवेत नवे मानक तयार करण्याची संधी ओळखली. यासाठी टीआरआयएलने असे एक स्मार्ट आणि एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करण्यावर भर दिला, जिथे प्रत्येक ग्राहकाची माहिती आणि पहिल्या चौकशीपासून ते खरेदी नंतरच्या सेवांपर्यंत त्याच्याशी झालेला संवाद कोणत्याही टीम मेंबरला लगेच पाहता येईल.

या भागीदारीबद्दल संजय दत्त, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे एमडी आणि सीओ यांनी सांगितले की, “सेल्सफोर्स सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला डेटा, इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यांना एकाच सिस्टीममध्ये आणता आले. यामुळे ग्राहकांना जलद प्रतिसाद देणे, चांगले लीड क्वालिफिकेशन आणि कन्व्हर्जनमध्ये सुधारणा असे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे आमच्या टीमला योग्य वेळी योग्य माहिती मिळत आहे, ज्यामुळे ते ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर आणि उत्तम सेवा देण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.”

अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – सेल्सफोर्स यांनी सांगितले की, “कोणतेही तंत्रज्ञान वापरताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की ते खरोखर ग्राहकाला अधिक चांगली सेवा देते का? टाटा रियल्टीच्या बाबतीत याचे उत्तर स्पष्ट आहे. आता ग्राहकांना काही दिवस वाट पाहावी लागत नाही, तर काही तासांतच प्रतिसाद मिळतो. सेल्स टीमचा माहिती शोधण्यात जाणारा वेळ कमी झाला असून ते आता ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करण्यावर अधिक लक्ष देऊ शकतात. तसेच लीडरशिप टीम रिअल-टाइम डेटाच्या आधारे जलद आणि योग्यनिर्णय घेत आहे. एआयचे खरे काम म्हणजे लोकांचे काम अधिक सोपे आणि प्रभावी बनवणे, कार्यक्षमता वाढवणे आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देणे. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात स्मार्ट आणि वैयक्तिक ग्राहक अनुभवासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे.”

भारताचा रिअल इस्टेट बाजार वेगाने बदलत असताना, टीआरआयएलने एआय-आधारित ग्राहक सेवेमध्ये केलेली गुंतवणूक कंपनीला त्यांच्या वाढत्या प्रकल्पांमध्ये अधिक चांगली आणि वैयक्तिक सेवा मोठ्या प्रमाणावर देण्यास मदत करणार आहे. यामुळे ग्राहकांना अपेक्षित असलेला प्रीमियम अनुभवही कायम ठेवता येणार आहे.

प्रीमियम प्रकल्प आणि ग्राहक-केंद्रित कामासाठी ओळखली जाणारी टीआरआयएल आता आपले कामकाज आणि ग्राहक सेवा आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पुढील टप्प्यात, कंपनी आपल्या कमर्शियल रिअल इस्टेट व्यवसायातही सेल्सफोर्सचा विस्तार करत आहे. तसेच रेसिडेन्शियल विभागात एजंटफोर्स मार्केटिंग आणि डेटा 360 च्या मदतीने अधिक वैयक्तिकृत सेवा आणि ग्राहकांविषयी सखोल माहिती देण्यावर भर दिला जात आहे. 

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार