पर्पल स्टाइल लॅब्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी खुली होणार

पर्पल स्टाइल लॅब्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ)

सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी खुली होणार

 

     ·        प्रति इक्विटी शेअर 546 रु. ते 575 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे

·         फ्लोअर प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रती शेअर 10 रु.) 54.6 पट आणि कॅप प्राईस 57.5 पट.

·         बोली/ऑफर सोमवार, 31 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल आणि बुधवार, 02 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल (“Bid Dates”)

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026

·         बोली किमान 26 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 26 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल  (“No. of Bids”)



पर्पल स्टाइल लॅब्स लिमिटेड (कंपनी) आपल्या इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी खुली करणार आहे. प्रति इक्विटी शेअर 546 रु. ते 575 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. (“Price Band”).  बोली किमान 26 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 26 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Minimum Bid Lot”). प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 आहे. बोली/ऑफर सोमवार, 31 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईलया ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 680 कोटी रु. पर्यतच्या इक्विटी शेअर्सचा संपूर्णपणे फ्रेश इश्यू समाविष्ट आहे.

 24 ऑगस्ट 2026 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे, 25 ऑगस्ट 2026 रोजीच्या दुरुस्तीपत्रासह (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस किंवा RHP) जारी करण्यात येणारे इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. इश्यूच्या उद्देशासाठी, नियुक्त स्टॉक एक्स्चेंज म्हणून NSE असेल. अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (यापूर्वीचे आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी) हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. 

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs आणि तो हिस्सा QIB Portion) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (Anchor Investor Portion) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की SEBI ICDR नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. (यास अँकर गुंतवणूकदार वाटप किंमत असे संबोधले जाईल).

वरील कलम (ii) मध्ये नमूद केलेल्या राखीव श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. अँकर गुंतवणूकदार हिस्स्यामध्ये अपुरी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB हिस्स्यामध्ये (प्रमुख गुंतवणुकदार हिस्सा वगळून) जोडले जातील. (the Net QIB Portion). ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार