एसव्हेक्टर लिमिटेडचा इक्विटी शेअर्सचा इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) २५ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार

एसव्हेक्टर लिमिटेडचा इक्विटी शेअर्सचा इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ)              २५ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार

·         दर्शनी मूल्य प्रत्येकी १ रुपया असलेल्या इक्विटी शेअरसाठी प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३० रुपये ते ३२ रुपये निश्चित करण्यात आला आहे ("इक्विटी शेअर").

·         ही ऑफर बोली लावण्यासाठी शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी खुली होईल आणि मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होऊन त्याच दिवशी बंद होईल.

·         किमान ४६८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ४६८ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावली जाऊ शकते.

·         


Sएसव्हेक्टर लिमिटेड ("एसव्हेक्टर" किंवा "कंपनी") ने जाहीर केले आहे की, कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या इनिशिएल पब्लिक ऑफरिंगच्या ("ऑफर") संदर्भातील बोली/ऑफर खुली होण्याची तारीख शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ असणार आहे. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ असेल. दर्शनी मूल्य प्रत्येकी १ रुपया असलेल्या इक्विटी शेअरसाठी प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३० रुपये ते ३२ रुपये निश्चित करण्यात आला आहे ("इक्विटी शेअर").

या ऑफरमध्ये कंपनीकडून एकूण २,८७०.०० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूचा ("फ्रेश इश्यू") आणि कंपनीच्या काही विद्यमान भागधारकांद्वारे ("विक्री करणारे भागधारक" / सेलिंग शेअरहोल्डर्स) ४१,५६२,५०० पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरचा ("ऑफर फॉर सेल") समावेश आहे.

कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ रकमेचा वापर पुढील बाबींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते: (i) कंपनीच्या मार्केटप्लेस व्यवसायासाठी लागणाऱ्या मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनच्या खर्चाच्या एका भागासाठी निधी पुरवणे, (ii) कंपनीच्या मार्केटप्लेस व्यवसायाच्या टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरच्या खर्चासाठी निधी देणे, आणि (iii) संपादनांच्या (अॅक्विझिशन्स) माध्यमातून इनऑरगॅनिक वाढ आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी निधी पुरवणे ("ऑब्जेक्ट्स ऑफ द ऑफर").

ऑफर फॉर सेलमध्ये पुढील इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे: स्टारफिश आय प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ("प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर") २७,६०७,०८२ पर्यंत इक्विटी शेअर्स; नेक्सस इंडिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स II द्वारे ७,३९१,११३ पर्यंत इक्विटी शेअर्स; एफआयएच बिझनेस ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (पूर्वी वंडरफुल स्टार प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) १,७४०,५२८ पर्यंत इक्विटी शेअर्स; नेक्सस अपॉर्च्युनिटी फंड लिमिटेडद्वारे ८३९,७१३ पर्यंत इक्विटी शेअर्स; नेक्सस व्हेंचर्स III लिमिटेडद्वारे ४६५,५९९ पर्यंत इक्विटी शेअर्स; रुपेन इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे २६९,१२० पर्यंत इक्विटी शेअर्स; सेंटॉरस ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे २६९,१२० पर्यंत इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, "इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स"); केनेथ स्टुअर्ट ग्लास यांच्याद्वारे १,३२०,७९९ पर्यंत इक्विटी शेअर्स; जेसन अशोक कोठारी यांच्याद्वारे १,१११,६८० पर्यंत इक्विटी शेअर्स; लॉरेंट बर्नार्ड अमोय्याल यांच्याद्वारे २२४,७८६ पर्यंत इक्विटी शेअर्स; मिशा कोहली यांच्याद्वारे २१५,२८० पर्यंत इक्विटी शेअर्स; राधिका गुप्ता यांच्याद्वारे ५३,८४० पर्यंत इक्विटी शेअर्स; आणि नलिन लुईस मोनिझ यांच्याद्वारे ५३,८४० पर्यंत इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, "इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर्स").

अँकर इन्व्हेस्टर बिड/ऑफर कालावधी गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होऊन त्याच दिवशी बंद होईल. सबस्क्रिप्शनसाठी बिड/ऑफर कालावधी शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल आणि मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल.

या ऑफरचा प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३० रुपये ते ३२ रुपये निश्चित करण्यात आला आहे. किमान ४६८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ४६८ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावली जाऊ शकते.

आरएचपीद्वारे देऊ केल्या जाणाऱ्या इक्विटी शेअर्सची बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") वर नोंदणी (लिस्टिंग) करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरच्या उद्दिष्टांसाठी, एनएसई डेझिग्नेटेड स्टॉक एक्सचेंज आहे.


Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार