ओरीयंट केबल्स (इंडिया) लिमिटेडची 5,520.00 दशलक्ष रु. साठीची प्राथमिक समभाग विक्री 25 सप्टेंबर 2026 रोजी खुली होणार

 

ओरीयंट केबल्स (इंडिया) लिमिटेडची 5,520.00  दशलक्ष रु. साठीची

प्राथमिक समभाग विक्री 25 सप्टेंबर 2026 रोजी खुली होणार

·         1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी (इक्विटी शेअर्स) 258 रु. ते 272 रु. असा किंमतपट्टा निश्चित

·         बोली/ऑफर शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक गुरूवार, 24 सप्टेंबर 2026 आहे.

·         बोली 1 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 55 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 1 रु. दर्शनी मूल्याच्या 55 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

 


ओरीयंट केबल्स (इंडिया) लिमिटेड (कंपनी) शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 पासून आपल्या इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली करत आहेत. बोली/ऑफर मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईलप्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक गुरूवार, 24 सप्टेंबर 2026 आहे. 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी (इक्विटी शेअर्स) 258 रु. ते 272 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

 या ऑफरमध्ये कंपनीकडून 3,200.00 दशलक्ष रु. किंमती पर्यंत प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (फ्रेश इश्यू), तसेच काही विद्यमान भागधारकांकडून (प्रवर्तक विक्री समभागधारक) 2,320.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ऑफर केलेले शेअर्स) समाविष्ट आहेत. ऑफरचा एकूण आकार 5,520.00 दशलक्ष रु. पर्यंत आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार