स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी खुली होणार
स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग
विक्री (आयपीओ)
बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी खुली होणार
·
स्टीमहाऊस
इंडिया लिमिटेड (“कंपनी”) च्या 2 रु. दर्शनी
मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 77 रु. ते 81 रु. असा किंमतपट्टा निश्चित
·
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा
दिनांक - मंगळवार,
08 सप्टेंबर 2026
·
बोली/ऑफर बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी खुली होईल आणि
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल.
·
बोली किमान 185 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 185 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
·
स्टीमहाऊस इंडिया लिमिटेड
(“कंपनी”) ने
बुधवार, 09 सप्टेंबर 2026 पासून
प्रत्येकी 2 रु. किंमतीच्या आपल्या इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख
गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी
म्हणजेच मंगळवार, 08 सप्टेंबर
2026 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 11
सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल.
कंपनीच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 77 रु. ते 81 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 185 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 185 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
ऑफरमध्ये 353 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि विक्री समभागधारकाकडून 61 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्रीची ऑफर (“ऑफर फॉर सेल”) यांचा समावेश आहे. फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल यांना एकत्रितपणे “ऑफर” असे संबोधले जाईल. ऑफरचा एकूण आकार 414 कोटी रु. इतका आहे. कंपनीने ऑफरमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील बाबींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे: (अ) कंपनीने घेतलेल्या काही थकीत कर्जांची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड किंवा मुदतपूर्व परतफेड; (ब) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी. यामध्ये अंकलेश्वर सुविधा केंद्र (फेज 3) आणि पानोली सुविधा केंद्र (फेज 2) यांच्या क्षमतेचा विस्तार समाविष्ट आहे, पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक भांडवली खर्चासाठी निधी उपलब्ध करणे; (क) दहेज GIDC येथे स्टीम निर्मितीसाठी नवीन उत्पादन सुविधा केंद्र उभारण्यासाठी (फेज 2) आवश्यक भांडवली खर्चासाठी निधी उपलब्ध करणे; आणि (ड) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी.
स्टीमहाऊस इंडिया लिमिटेड ही भारतीय कंपनी असून ती आपल्या पाइपलाइन नेटवर्कद्वारे स्टीम आणि नायट्रोजनसह औद्योगिक वायूंची निर्मिती आणि केंद्रीकृत वितरण करण्यात विशेष कार्यरत आहे.
कंपनी आणि तिचे प्रवर्तक हे भारतातील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे प्रणेते आहेत. ही प्रणाली प्रथम 2014 मध्ये सुरू करण्यात आली. कंपनीची कम्युनिटी औद्योगिक वायू निर्मिती आणि वितरण प्रणाली पाइपलाइन नेटवर्कद्वारे विविध औद्योगिक ग्राहकांना वायूचा पुरवठा करते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला स्वतःची स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था उपलब्ध होते. स्टीमहाऊसच्या औद्योगिक वायू व्यवसायामध्ये स्टीम निर्मिती आणि वितरण; स्टीम खरेदी आणि वितरण; तसेच नायट्रोजनचे पृथक्करण, कॉम्प्रेशन आणि वितरण यांचा समावेश आहे. कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये आपल्या अंकलेश्वर सुविधा केंद्रात वितरित पाइपलाइन नेटवर्कद्वारे नायट्रोजन पुरवठ्यासाठीची पहिली सुविधा सुरू केली.

Comments
Post a Comment