!! ठाण्याचा महाराजा !!
!! ठाण्याचा महाराजा !!
बालमित्र गणेशोत्सव मंडळाची स्थापना सन 1976 साली श्री. देवेंद्र शंकर कारेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला मंडळाच्या माध्यमातून लहान मुलांची भाषणे, संगीत, नाटक आणि अनेक समाजपयोगी कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले ते आज पर्यंत मग ती नैतिकतेची मदत असो, शैक्षणिक मदत असो, अपंग व गरजू लोकांसाठी मदत असो, पर्यावरण जनजागृती , समाज प्रबोधन आणि सामाजिक उपक्रमात आपले मंडळ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. 2021-22 च्या कोविडच्या महाभयंकर महामारीत देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या तब्येतीची तमा न बाळगता हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला. अशी माहिती बालमित्र गणेशोत्सव मंडळ म्हणजेच ठाण्याचा महाराजा या मंडळाचे उपसचिव संतोष शिंदे यांनी दिली आहे.
मंडळाच्या रोप्यमहोत्सवी वर्षी गरुडावर विराजमान असलेली भव्य 25 फुटी उंच मूर्ती हे मंडळाचे विशेष आकर्षण ठरलं. वर्षानुवर्ष चालू असलेली एक गाव एक गणपती हे परंपरा, भव्य देखावे आणि लोकसहभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यामुळे बालमित्र गणेशोत्सव मंडळ यालाच " ठाण्याचा महाराजा " म्हणून ओळखले जाऊ लागले
हि फक्त उत्सवाची परंपरा नाही तर समाज एकतेची, संस्कृतीची आणि भक्तीची ओळख आहे गेली 50 वर्षे आपल्या मंडळाने सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य करत जनमानसात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री ठाण्याची शान सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आवर्जून भेट देतात. आमच्या लाडक्या कार्यसम्राट नगरसेविका सौ.जयश्रीताई पाठक यांच्या माध्यमातून होणारी महिलांची महाआरती हे विशेष आकर्षण ठरले आहे. तसेच लालबागच्या राजाचे सचिव सन्मा. सुधीर भाऊ साळवी ,हिंदी सिने कलाकार संजय दत्त, सुनील शेट्टी आणि सुप्रसिद्ध मराठी कलाकार सुशांत शेलार ,संतोष जुवेकर, दिपाली सय्यद, दिग्दर्शक प्रवीण तरडे, विजय माने, मंगेश देसाई यासारखे अनेक सेलिब्रिटी ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला आले होते .

Comments
Post a Comment